एक्स्प्लोर
वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्याबद्दल बुमराह म्हणतो....
लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफीतला टीम इंडियाचा शिलेदार जसप्रीत बुमराला वेस्ट इंडिज दौऱ्यातून दिलेल्या विश्रांतीमागचं कारण फिटनेस नसून त्याच्यावरचा ताण कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. दस्तुरखुद्द बुमरानंच ही माहिती दिली.
टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्याला 23 जूनपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराला या दौऱ्यातून विश्रांती दिली आहे.
या विश्रांतीचा फिटनेसशी संबंध नसल्याचं सांगून बुमरा म्हणाला की, मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे. निवड समिती आणि संघव्यवस्थापनानंच मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. विंडीज दौऱ्यातून देण्यात आलेल्या विश्रांतीनं आपली निराशा झाली नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं.
दरम्यान, वेस्टइंडिज दौऱ्यासाठी सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement