एक्स्प्लोर

Hocky Asia Cup 2022: ऐतिहासिक! कोरियानं पाचव्यांदा आशिया हॉकी चषकावर कोरलं नाव, भारताला कांस्यपदक

Hocky Asia Cup 2022: दक्षिण कोरियाने हॉकी आशिया चषक 2022 चं विजेतेपद पटकावलं आहे. या आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन संघानं मलेशियाचा 2-1 असा पराभव करून ट्रॉफी जिंकली.

Hocky Asia Cup 2022: दक्षिण कोरियाने हॉकी आशिया चषक 2022 चं विजेतेपद पटकावलं आहे. या आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन संघानं मलेशियाचा 2-1 असा पराभव करून ट्रॉफी जिंकली. हॉकी आशिया चषक स्पर्धेत कोरियाच्या संघाचं हे विक्रमी पाचवं विजेतेपद आहे. दक्षिण कोरियाकडून मांजे जंग (17व्या मिनिटात) आणि टेल ह्वांग (52व्या मिनिटात) यांनी गोल केला. तर, मलेशियासाठी सय्यद चोलननं 25 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

जपानला नमवून भारतानं कांस्यपदक जिंकलं
भारताच्या युवा हॉकी संघानं बुधवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात जपानचा 1-0 असा पराभव करून आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पहिल्या पाच मिनिटांत अनेक फटके मारून संघाला चांगली सुरुवात केली. परंतु त्यांना डी मध्ये यश आलं नाही. सातव्या मिनिटाला उत्तम सिंहनं उजव्या बाजूनं चेंडू राजकुमारकडे वळवला, ज्यानं जपानी गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवा देत गोल केला. तीन मिनिटांनंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्याचा भारतीय संघाला फायदा घेता आला नाही. 

कोरियाविरुद्ध सामना बरोबरीत सुटला
 कोरियाविरुद्ध सामन्यात आठव्या मिनिटाला नीलम संजीपनं भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर कोरियानं दोन गोल केले. त्यानंतर 20व्या मिनिटाला मनिंदर सिंहनं गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. सेशे गौडाने अल्पावधीतच भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, कोरियाच्या किमनं 27 व्या मिनिटाला गोल करून पुन्हा बरोबरी साधली. तिसर्‍या क्वार्टरमध्ये मारिसवरन शक्तीवेलनं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जंग मांजेनं पुन्हा गोल करून बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
Pune Rains: पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली
पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली
पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं, कोर्टाकडून थेट लूक आउट सर्क्युलर जारी, प्रकरण नेमकं काय?
पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं, कोर्टाकडून थेट लूक आउट सर्क्युलर जारी, प्रकरण नेमकं काय?
Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले
आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vadgaon Sheri Mahayuti : सुनिल टिंगरे यांना महायुती धर्म पाळण्याचा विसर पडला - जगदीश मुळीकTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 ऑगस्ट 2024 : ABP MajhaCM Eknath Shinde : मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांची मुख्यमंत्री पाहणी करणारABP Majha Headlines :  8 AM : 26 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
Pune Rains: पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली
पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली
पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं, कोर्टाकडून थेट लूक आउट सर्क्युलर जारी, प्रकरण नेमकं काय?
पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं, कोर्टाकडून थेट लूक आउट सर्क्युलर जारी, प्रकरण नेमकं काय?
Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले
आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले
Vasant Chavan Passes Away: त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने वडेट्टीवार हळहळले
त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने वडेट्टीवार हळहळले
Maharashtra Politics : वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसंचा फोटोच नाही, माजी आमदार म्हणतो...
वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसंचा फोटोच नाही, माजी आमदार म्हणतो...
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा काय करतोय?; प्रशिक्षकासोबतचा व्हिडीओ आला समोर
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा काय करतोय?; प्रशिक्षकासोबतचा व्हिडीओ आला समोर
Travel : 'रेल्वेने प्रवास करतोय, लाल आणि निळ्या डब्यात फरक काय रे भाऊ? प्रवासासाठी कोणता डबा अधिक सुरक्षित?'
Travel : 'रेल्वेने प्रवास करतोय, लाल आणि निळ्या डब्यात फरक काय रे भाऊ? प्रवासासाठी कोणता डबा अधिक सुरक्षित?'
Embed widget