Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला.
IND vs ENG, Hockey WC 2023 : भारतीय संघ हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेत आज इंग्लंड संघाचा सामना करण्यासाठी (IND vs ENG) मैदानात उतरला होता. पण निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने अखेर सामना बरोबरीत सुटला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत भारत आणि इंग्लंड हॉकीच्या मैदानात आले असताना रंगतदार सामनेच झाले आहेत. पण हे बहुतेक सामना हायस्कोरिंग झाले असून आज मात्र एकही गोल पाहायला मिळाला नाही. ज्यामुळे सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.
राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेंकाशी भिडले होते. दरम्यान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकतर्फी पद्धतीने जिंकला होता, त्यामुळे या सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार होती, हे जवळपास निश्चित होतं. पण स्पर्धा इतकी अटीतटीची झाली की दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. ज्यामुळे सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. दुसरीकडे भारत असणाऱ्या गटात स्पेन आणि वेल्स या संघामध्ये सामना झाला. ज्या सामन्यात स्पेनने 5-1 अशा एकतर्फी विजय मिळवला. भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना 19 जानेवारी रोजी वेल्स संघाविरुद्ध होणार आहे.
View this post on Instagram
ग्रुप D मध्ये चुरस
या विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आहेत. यात चार गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये चार संघ आहेत. प्रत्येक गटामधील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवेल, तर पूलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांना क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे अंतिम-आठमध्ये स्थान मिळू शकेल. अशा परिस्थितीत D पूलमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी आज भारत आणि इंग्लंड यांच्यात आजचा सामना झाला. आजच्या सामन्यातील विजेत्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळण्याची अधिक संधी होती. कारण भारत आणि इंग्लंड दोघांनी सुरुवातीचे सामने जिंकले होते. पण आज दोघांना एकही गोल करता न आल्याने सामना अनिर्णित सुटला. तर दुसरीकडे स्पेनने वेल्सवर 5-1 असा मोठा विजय मिळवला. ज्यामुळे आता ग्रुप D मध्ये चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 21 सामने झाले होते. ज्यात भारतीय संघाने 10 सामने जिंकले होते, तर इंग्लंडने 7 सामने जिंकले होते. तसंच 4 सामने अनिर्णित राहिले होते. ज्यानंतर आजचा सामनाही बरोबरीत सुटल्याने एकूण 5 सामने आता दोन्ही संघातील अनिर्णित राहिले आहेत.
हे देखील वाचा-