एक्स्प्लोर

विक्रमादित्य रोहित | 'हिटमॅन'ची गांगुली, जयसूर्याशी बरोबरी तर धोनी, विराटचे रेकॉर्ड मोडले

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने विंडीजविरुद्धच्या सामन्यात विक्रमांचा पाऊसच पाडला. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवणारे विंडीजचे गोलंदाज दुसऱ्या सामन्यात रोहितच्या खेळीसमोर पुरते निष्रभ ठरलेले दिसले. या सामन्यात रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

मुंबई : भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने विंडीजविरुद्धच्या सामन्यात विक्रमांचा पाऊसच पाडला. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवणारे विंडीजचे गोलंदाज दुसऱ्या सामन्यात पुरते निष्रभ ठरलेले दिसले. विशाखापट्टणममध्ये रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28 वं शतक साजरं केलं. त्यानं केलेली 159 धावांची खेळी ही यंदाच्या वर्षात वन डेतली सातवी शतकी खेळी ठरली. या कामगिरीसह त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्या दोघांनी अनुक्रमे 2000 आणि 2016 साली एकाच वर्षात सात शतकं ठोकली होती. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त नऊ शतकं ठोकण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 1998 साली सचिननं ही कामगिरी केली होती. यासह आणखी काही विक्रमाला रोहितने गवसणी घातली आहे. विराटच्या पुढे गेला हिटमॅन रोहित रोहितने या या सामन्यात झळकावलेल्या शतकासह त्याने विराट कोहलीला शतकांच्या शर्यतीत मागे टाकले. 2017 या वर्षाच्या सुरूवातीपासून ते डिसेंबर 2019 या कालावधीतील रोहितचे हे 18 वे शतक ठरले. भारताकडून या दोन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावे होता. त्याने 17 एकदिवसीय शतके झळकावली होती. पण वेस्ट इंडीजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने दमदार 18 वे शतक ठोकले. धोनीचेही रेकॉर्ड मोडले या खेळीदरम्यान रोहित शर्माने सुरुवाती संथ खेळी केली मात्र नंतर खेळपट्टीवर जम बसवत रोहितने तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करत धोनी आणि विराटला मागे टाकलं. वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानी पोहोचला आहे. विंडीजविरुद्ध वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत 28 षटकारांसह महेंद्रसिंह धोनी पहिल्या नंबरवर होता तर विराट कोहली 25 षटकारांसह दुसऱ्या स्थानी होता. आता रोहित 29 षटकारांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. गांगुली आणि जयसूर्याशी बरोबरी रोहितने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं २८ वं शतक झळकावलं. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने लोकेश राहुलसोबत २२७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सौरव गांगुली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशी बरोबरी केली आहे. 2019 वर्षातलं रोहितचं वन-डे क्रिकेटमधलं हे सातवं शतक ठरलं आहे. याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याशी बरोबरी केली आहे. सलग तिसऱ्या वर्षात सर्वाधिक षटकार 2019 - रोहित शर्मा (77) 2018 - रोहित शर्मा (74) 2017 - रोहित शर्मा (65) 2015 - एबी डिव्हीलियर्स (63)

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Playing XI : ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
वयाच्या 55व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा फिटनेस! थेट आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली 2 गोल्ड मेडल, कोण आहे पुण्याचे राजेंद्र गायकवाड?
वयाच्या 55व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा फिटनेस! थेट आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली 2 गोल्ड मेडल, कोण आहे पुण्याचे राजेंद्र गायकवाड?
IND vs NZ 1st ODI Live Streaming : विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
IND VS NZ ODI Schedule : टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget