एक्स्प्लोर
रैना बरसला... कोलकातावर चार गडी राखून मात
कोलकाता: कर्णधार सुरेश रैनाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सनं कोलकाता नाईट रायडर्सला चार विकेट्स राखून हरवलं. आयपीएलच्या दहाव्या मोसमात गुजरातचा हा पाच सामन्यांमधला दुसराच विजय ठरला. तर कोलकाता नाईट रायडर्सचा हा पाच सामन्यांमधला दुसराच पराभव ठरला.
ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात रॉबिन उथप्पाच्या 72 आणि सुनील नारायणच्या 42 धावांच्या खेळींच्या जोरावर कोलकात्यानं 20 षटकांत पाच बाद 187 धावांची मजल मारली होती. मग विजयासाठी 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या मॅक्युलमनं अरॉन फिन्चच्या साथीनं सलामी ला 42 धावांची झटपट भागीदारी रचली.
पावसानं व्यत्यय आणल्यामुळं या सामन्यात पाऊण तासाचा वेळ वाया गेला. त्यात मॅक्युलम 17 चेंडूंत 33 धावांवर माघारी परतल्यानं गुजरातची टीम संकटात सापडली होती. पण रैनानं एका बाजूनं धावांचा ओघ सुरू ठेवला आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रैनानं 46 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांसह 84 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement