एक्स्प्लोर

coronavirus | आयपीएल सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार

मोसमात मुंबई इंडियन्सचे सात साखळी सामने आणि यंदाच्या मोसमाची फायनल असे मिळून 15 सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहेत. येत्या 29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचं आयोजन करण्यात येईल.

मुंबई : बीसीसीआयनं आयपीएलच्या सामन्यांचं मुंबईत आयोजन करावं, पण या सामन्यांची तिकीटविक्री करू नये, अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी आयपीएलचा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गर्दी करू नये म्हणून राज्य सरकारनं तिकीटविक्री करू न देण्याची सावध भूमिका घेतली आहे. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे सात साखळी सामने आणि यंदाच्या मोसमाची फायनल असे मिळून 15 सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहेत. येत्या 29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचं आयोजन करण्यात येईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भातही बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो. मात्र तसं करणं कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर लक्षात घेत आयपीएलच्या तारखांची घोषणा केली जाते. त्यामुळे आयपीएलची तारीख मागे-पुढे होणे तुर्तास तरी शक्य वाटत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली तर आयपीएल स्पर्धा रद्द केली जाणार हे निश्चित आहे. कोरोना व्हायरस गर्दीमुळे जास्त पसरतो. या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केली आहे. यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे म्हटले होते. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार कोरोनासंदर्भातील खबरदारीचे सर्व उपाय योजना करु, असेही गांगुली यांनी म्हटले होते. Coronavirus | कोरोनाच्या भीतीने विधानभवनात एक दिवसाच्या पासवर बंदी पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य पातळीवर कोरोना व्हायरसबाबत जगजागृती केली जात आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख 10 हजारांवर पोहोचली आहे, तर 3 हजार 600 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3119 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्यी 366 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. गेल्या 24 तासात बळींच्या आकड्यात 133 ने वाढला आहे. संबंधित बातम्या : Coronavirus Effect | कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget