एक्स्प्लोर
Advertisement
आमच्या बाळाचं नाव ठरलंय : सानिया मिर्झा
गोव्यातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित गोवा फेस्टमधील नॉलेज सीरिजमध्ये सानिया बोलत होती.
पणजी: आम्हाला मूल झालं तर त्याचं नाव मिर्झा-मलिक असेल, माझं आणि नवऱ्याचं याबाबतीत एकमत झालं आहे. शोएबला छानशी मुलगी हवी आहे, असं टेनिसस्टार सानिया मिर्झाने सांगितलं.
गोव्यातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित गोवा फेस्टमधील नॉलेज सीरिजमध्ये सानिया बोलत होती.यावेळी सानियाने आपला जीवनप्रवास उलगडून सांगितला.
भेदभाव नाही
सानिया म्हणाली,आम्ही दोघी बहिणी असताना देखील आमच्या आई वडीलांना कधीच एखादा मुलगा असावा असं वाटलं नाही. त्यांनी आम्हाला मुलांसारखं वागवलं. आम्हालाही कधी एखादा भाऊ असावा असं वाटलं नाही. वयाच्या सहाव्या वर्षी टेनिस रॅकेट हाती घेऊन स्ट्रगल करत पुढे गेले. त्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले, असं सानिया म्हणाली.
क्रिकेटशिवाय अन्य खेळांना महत्त्व
आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्व दिले जात असले तरी, अलिकडच्या काळात चित्र बदलले आहे. आता इतर खेळांनादेखील महत्व मिळू लागले, असं सानियाने नमूद केलं.
आज महिला क्रीडापटूंनीदेखील आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवली आहे. आज 10 ते 12 नावं महिला क्रीडा विश्वात आदराने घेतली जातात, असं सानियाने सांगितलं.
देशात आज क्रीडा वाहिन्या वाढत आहेत. वर्तमानपत्रांमध्येही क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांबद्दल येणारे कव्हरेज वाढत असल्याबद्दल सानियाने समाधान व्यक्त केले.
मोहरापासून अक्षय कुमारची फॅन
आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना सानिया म्हणाली, मी हैदराबादची असल्याने मला हैदराबादी बिर्याणी खूप आवडते. मात्र मला कुठलंच जेवण बनवता येत नाही. जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा कुर्ता पायजमा घालून टीव्ही बघत बसणे खूप आवडते. मी अक्षय कुमारची खूप मोठी फॅन आहे. मोहरा पासून मी त्याची चाहती आहे, असं सानिया म्हणाली.
..तर इंटेरियर डिझायनर झाले असते
टेनिस प्लेयर नसते तर इंटेरियर डिझायनर व्हायला आवडलं असतं, असं सानियाने सांगितलं. दुबईमधील घरी आपण आपली इंटेरियर डिझायनिंगची हौस भागवली असल्याचे ती म्हणाली.
कपड्यांवरुन टीका का?
महिला आणि पुरुष टेनिस खेळाडूंची मेहनत, कसब सगळं काही सेम असताना, पुरुषांना आणि महिला खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांमध्ये असलेल्या तफावतीबद्दल सानियाने नाराजी व्यक्त केली. कपडयांवरुन टीका करणाऱ्यांनी कामगिरी बघावी असा सल्लादेखील तिने दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement