एक्स्प्लोर
गीता फोगाटच्या घरी आला गोंडस पाहुणा, चिमुकल्याचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल खूश!
भारताची अव्वल कुस्तीपटू गीता फोगाट हिने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिच्या या बाळाचे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : 2010 मध्ये भारताला महिलांच्या कुस्तीत पहिलं सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या पैलवान गीता फोगाटने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला पैलवान गीता फोगाट हिने तिच्या फेसबुक पेजवर तिचे बाळ आणि पती पवन कुमार याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या गोंडस बाळाचे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. तसेच अनेकांनी तिच्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.
गीताने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हॅलो बॉय. या जगात तुझं स्वागत आहे. या चिमुकल्या बाळाने आमचं जीवन शानदार बनवलं आहे. स्वतःच्या बाळाला पाहिल्यानंतरच्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. याला खूप प्रेम आणि आशीर्वाद द्या.
रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या गीताने काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडियावरुन शेअर केले होते. तिने त्यावेळी म्हटले होते की, आई झाल्यानंतर ती लवकरच मॅटवर (कुस्तीच्या रिंगणात) परतणार आहे. आता गीता कधीपर्यंत कुस्तीच्या रिंगणात परतणार, हे पाहायचं आहे.
HELLO BOY !! WELCOME TO THE WORLD 🥰🤗 He is here 🤗 we are so much in love ❤️ 👶🏻 please give him your love and blessings 🙏😇 he made our life perfect now 🙏👪 Nothing can be described the feelings of watching your own baby be born 😍 Date - 24-12-2019 pic.twitter.com/9KAc3Ew15c
— geeta phogat (@geeta_phogat) December 24, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement