French Open Final 2025: अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती; तर कार्लोस अल्कराज पुन्हा फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी सज्ज, आज रंगणार फायनल
French Open Final 2025: स्पेनचा कार्लोस अल्कराज आणि इटलीचा यानिक सिनर या दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये आज फ्रेंच ओपनची अंतिम लढत रंगणार आहे.

French Open Final 2025: कार्लोस अल्कराज पुन्हा फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम लढतीचा सामना होणार आहे. स्पेनचा अल्कराज आणि इटलीच्या सिनरमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे सिनर ग्रँड स्लॅम विजेतेपदाची हॅटट्रिक साधणार का?, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
स्पेनचा कार्लोस अल्कराज आणि इटलीचा यानिक सिनर या दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये आज फ्रेंच ओपनची अंतिम लढत रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता अंतिम लढतीला सुरुवात होईल. गतविजेत्या कार्लोस अल्कराजसमोर यंदा सिनरचं तगडं आव्हान आहे. गेल्या वर्षी अमेरिकन ओपन आणि यंदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावल्यानंतर सिनरनं सलग तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची फायनल गाठली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्यानं 24 ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. त्यामुळे सिनरला ग्रँड स्लॅम विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर अल्कराज सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून राफेल नदालनंतर क्ले कोर्टवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती-
अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती ठरली आहे. अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या सबालेंकावर सनसनाटी मात करत कोको गॉफने फ्रेंच ओपन स्पर्धेत बाजी मारली. पहिला सेट गमावल्यानंतरही गॉफने विजेतेपदावर मोहोर उमटवली. गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अमेरिकन टेनिसस्टार कोको गॉफनं यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. २१ वर्षांच्या गॉफनं अंतिम सामन्यात जगातली सध्याची नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेंकाला पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जेतेपदावर आपलं नाव कोरलं. तिनं पहिला सेट गमावल्यानंतरही हा सामना 6-7, 6-2, 6-4 अशा फरकानं जिंकला. 2015 साली सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी गॉफ ही ही पहिलीच अमेरिकन टेनिसपटू ठरली. दरम्यान गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिनं 2023 मध्ये वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.























