Lionel Messi Birthday : लिओनेल मेस्सीचा 36 वा वाढदिवस, स्टार फुटबॉलपटू नेमका फुटबॉलकडे वळला तरी कसा? जाणून घ्या...
Lionel Messi Birthday : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नेमका फुटबॉलकडे वळला तरी कसा? जाणून घ्या. यासोबतच इतर रंजक बाबींवर एक नजर...
Lionel Messi Birthday : जगातील स्टार फुटबॉल लिओनल मेस्सी (Lionel Messi) याचा आज वाढदिवस आहे. मेस्सी आज 36 वर्षांचा झाला. जगभगातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लिओनेल मेस्सी आता अमेरिकेतील इंटर मियामी क्लबशी जोडला जाणार आहे. यासाठी तो सध्या युरोप सोडून युएसएमध्ये (USA) दाखल झाला आहे. फीफा फुटबॉल विश्वचषक 2022 जिंकल्यामुळे मेस्सीसाठी गेलं वर्ष फारच विस्मरणीय राहिलं.
मेस्सीबाबतच्या काही खास गोष्टी
- मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना येथे झाला.
- लिओनेल अँड्रे मेस्सी (Lionel Andres Messi) हे त्याचं पूर्ण नाव
- मेस्सीचे वडील एका स्टील कारख्यानात मजूर म्हणून काम करायचे.
- मेस्सीला फुटबॉल खेळण्याची आवड त्याच्या आजीमुळे निर्माण झाली. आजीमुळे मेस्सी फुलबॉलकडे वळला.
- आजीसोबत मेस्सीचं खूप जवळचं नातं होतं. पण तो फक्त 10 वर्षांचा असताना त्याच्या आजीचं निधन झालं.
- मेस्सी 8 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याने प्रसिद्ध रोसारियो फुटबॉल क्लबकडून खेळणं सुरु केलं.
- मेस्सीची वाटचाल मात्र, सोपी नव्हती. तो अवघ्या 13 वर्षांचा असताना त्याला दुर्मिळ आजाराने ग्रासलं, यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या.
- सर्व अडचणींवर मात करत मेस्सी मात्र, जिद्दीने खेळत राहिला. याचाच परिणाम आहे की, सध्या जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं.
मेस्सीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. - बार्सिलोना टीमचा माजी खेळाडू लुईस सुआरेज मेस्सीचा जीवलग मित्र आहे.
- कोपा अमेरिका फायनल मध्ये अर्जेंटिनाच्या पराभवानंतर 2016 साली मेस्सीने काही काळासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्यानंतर त्याने हा निर्णय बदलला.
- ऑगस्ट 2020 साली मेस्सीने एफसी बार्सिलोना क्लबची साथ सोडत फ्रान्समध्ये पॅरिस सेंट-जर्मन क्लबसोबत करार करत संपूर्ण जगाला मोठा झटका दिला.
- 30 जून 2023 साली मेस्सीचा पॅरिस सेंट-जर्मन क्लबसोबतचा दोन वर्षांचा करार संपला.
- मेस्सीने त्याच्या एकूण कारकिर्दीतील 800 हून अधिक गोल्स केले आहेत.
- फिफा पुरस्कार सोहळा (FIFA Awards 2023) मध्ये लिओनेल मेस्सी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
-
फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनेल मेस्सीने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाइक केलेल्या फोटोचा विक्रमही आपल्या नावावर केला. विश्वचषक ट्रॉफी उंचावतानाच्या फोटोने 75 दशलक्ष लाईक्सचा आकडा गाठला.
-
मेस्सी सोशल मीडियावरूनही कोट्यवधी रुपये कमावतो. बडवायजर (Budweiser) बिअर, कॉम्प्युटर गेम कॉल ऑफ ड्यूटी, इ-फुटबॉल (eFootball), एनर्जी ड्रिंक गेटोरेड, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बिटगेट आणि प्रोस्थेटिक आयवेअर मेकर ऑर्कॅम या ब्रँडच्या इंस्टाग्राम जाहिरातींचा समावेश आहे.