एक्स्प्लोर

FIFA 2022 : BTS गायक Jungkook फिफा विश्वचषकात करणार परफॉर्म

FIFA Opening Ceremony : K-pop बँड BTS मधील सिंगर जंगकूक ( Jungkook ) फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्मन्स करणार आहे.

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक 2022 ची ( FIFA World Cup 2022 ) तयारी जोरात सुरू आहे. 20 नोव्हेंबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. फिफा वर्ल्ड कप उद्घाटन समारंभात अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. कोरियन बँड ( K-pop Band  ) बीटीएस ( BTS) मधील सदस्य जंगकूक ( Jungkook )  देखील उद्घाटन समारंभात ( FIFA Opening Ceremony ) परफॉर्म करणार आहे. याबाबत बीटीएसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक निवेदन जारी केले आहे. त्यामुळे फिफाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी फुटबॉलप्रेमी आणि बीटीएस चाहत्यांचा उत्साह आणखीनच वाढणार आहे.

केपॉप (K-Pop) बँड बीटीएस फिफामध्ये परफॉर्म करू शकतो अशी चर्चा बर्‍याच दिवसांपासून होती. मात्र यासंबंधीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. पण आता बीटीएसने अधिकृत निवेदन जारी करत जंगकूक फिफामध्ये परफॉर्म करणार असल्याचं सांगितलं आहे. बीटीएस सदस्य जंगकूक फिफामध्येही आपल्या गायकी आणि सादरीकरणाची जादू पसरवणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून भारतीय प्रेक्षकांना फिफा विश्वचषक उद्घाटन सोहळा पाहता येणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by @koreadispatch

BTS सदस्य जंगकूक फिफा विश्वचषकासाठीच्या खास फरफॉर्मन्ससाठी कतार येथे पोहोचला आहे. जंगकूकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जंगकूकचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय जंगकूक सध्या कतारमध्ये फिरण्याचा आनंद घेताना दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by 전 정국 이올시다 (@jungkook.97)

नोरा फतेही आणि शकीराचीही हजेरी 

ग्रॅमी पुरस्कार नामांकित बीटीएस सिंगर जंगकूकचे ( BTS Jungkook ) जगभरात असंख्य चाहते आहेत. जंगकूकचा आवाज चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित करतो. त्यामुळे जंगकूकचा फिफा उद्घाटन समारंभातील सहभाग आणखीनच खास आहे. याशिवाय, फिफा ओपनिंग सेरेमनीला शकीरा, नोरा फतेही आणि दुआ लिपा देखील परफॉर्म करणार आहेत. 

कोण आहेत BTS?

BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप (Kpop Boy Band) आहे. बीटीएस (BTS) म्हणजेच बांगतान बॉईज् (Bangtan Sonyeondan or Beyond the Scene) हा दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध बँड आहे. या बँडने कोरियन संगीत आणि कोरियन पॉप (K Pop) संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. या बँडमध्ये सात सदस्य आहेत. त्यांची नावं किम सोकजिन (Jin Aka Kim Seok-Jin), मिन युंगी (Suga Aka Min Yoongi), जंग होसोक (J Hope Aka Jung Ho-seok), किम नामजून (RM Aka Kim Nam-Joon), पार्क जीमिन (Jimin Aka Park Jimin), किम तेह्युंग (V - Kim Tae-Hyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook Aka Jeon Jung-kook) अशी आहेत..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget