एक्स्प्लोर

FIFA World Cup 2022 : फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवस शिल्लक, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये रंगणार सामने, स्पर्धेबाबत A टू Z माहिती एका क्लिकवर

FIFA WC 2022 : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर संघात 20 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

FIFA WC 2022 Live Telecast : जगातील बहुतांश देश खेळत असणारा खेळ म्हणजे फुटबॉल (Football). क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडत आहे. दरम्यान कतारमध्ये होणार्‍या यंदाच्या फिफा वर्ल्डकपला (FIFA WC 2022) फार कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता कतार आणि इक्वेडोर (Qatar vs Ecuador) यांच्यातील सामन्याने या भव्य स्पर्देची सुरुवात होईल. या स्पर्धेत जगभरातील फुटबॉल खेळणारे 32 सर्वोत्तम संघ सहभागी होत असून, 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. तर या भव्य स्पर्धेतील सामन्यांचं थेट प्रक्षेपण, ग्रुप स्टेजचे सामने अशी महत्त्वाची माहिती जाणून घेऊ...

कसे आहेत फिफा वर्ल्ड कपचे ग्रुप?

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

फिफा वर्ल्ड कप 2022 चं फॉर्मेट

ग्रुप स्टेजमध्ये, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये 16 पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल.

Fifa वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.

कुठे होणार सामने?

हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.

लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget