Fifa world cup 2022 : फिफा विश्वचषकात प्रेक्षकांना 'नो अल्कोहोल, नो बियर'; मैदानात दारु-बियर विक्रीला सक्त बंदी
FIFA WC 2022 : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात असून यजमान कतार आणि इक्वाडोर संघातील सामन्याने 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे.
![Fifa world cup 2022 : फिफा विश्वचषकात प्रेक्षकांना 'नो अल्कोहोल, नो बियर'; मैदानात दारु-बियर विक्रीला सक्त बंदी FIFA world cup 2022 Qatar to sell non alcoholic beverages only new regulations know details Fifa world cup 2022 : फिफा विश्वचषकात प्रेक्षकांना 'नो अल्कोहोल, नो बियर'; मैदानात दारु-बियर विक्रीला सक्त बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/18/08096d14d21c07bd8fc898d4aec75fcc1668776044981323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Qatar Fifa World Cup 2022 : रविवारपासून (18 नोव्हेंबर) कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) सुरू होत आहे. जगभरातील विविध देशांचे फुटबॉल प्रेमी कतारमध्ये एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. दरम्यान नुकत्याच कतारने त्यांच्या मद्य धोरणात मोठा बदल केला आहे. ज्यामुळे सामने होणाऱ्या दोहा आणि आसपासच्या आठ फुटबॉल स्टेडियममध्ये बिअरच्या विक्रीवर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारचे अधिकाऱ्यांनी फिफा विश्वचषकाचा स्पॉन्सर बडवायझरच्या सर्व विक्रीवर बंदी घालण्यासाठी दबाव आणत आहेत, असंही समोर आलं आहे.
विश्वचषक आयोजन समिती आणि फिफा या दोघांनीही यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे. बडवायझर (Budweiser) ही मूळ कंपनी प्रत्येक विश्वचषकावेळी मैदानात बिअर विकण्याच्या विशेष हक्कांसाठी लाखो डॉलर्स देते. बडवायझरची फिफासोबतची ही भागीदारी 1986 पासून सुरू आहे, पण यावेळी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक आयोजित केला जात असून त्याठिकाणी दारुबंदी करत हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2014 साली ब्राझीलमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ब्राझीलचे मद्य धोरण वेगळे आहे, पण फिफा विश्वचषक 2014 पूर्वी ब्राझीलने हे धोरण बदलले होते. ब्राझीलच्या अल्कोहोल धोरणात बदल झाल्यानंतर 2014 फिफा विश्वचषकादरम्यान ब्राझीलच्या स्टेडियममध्ये दारू विक्रीला सुरुवात झाली. पण यंदा कतारमध्ये मात्र अशी कोणतीही परवानगी मिळालेली नाही.
फिफा वर्ल्ड कप 2022 चं फॉर्मेट
ग्रुप स्टेजमध्ये, प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. राऊंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये 16 पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल.
Fifa वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?
ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.
कुठे होणार सामने?
हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)