Fifa World Cup 2022 : आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार फिफा वर्ल्डकपचा थरार, वाचा सविस्तर
Fifa WC : मागील काही काळात भारतात फुटबॉल चाहत्यांची संख्या वाढली असून सध्या फिफा विश्वचषक पाहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे .
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता हळूहळू अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. राऊंड ऑफ 16 चे सामने आता सुरु असून अगदी ग्रुप स्टेजपासून सामने अगदी अटीतटीचे होताना दिसत आहेत. दरम्यान आता हे रोमहर्षक सामने फुटबॉल फॅन्सना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लीझर लिमिटेडनने जाहीर केल्यानुसार, जगातील सर्वांत मोठी फुटबॉल स्पर्धा अर्थात फिफा वर्ल्ड कप 2022 मधील सामने भारतातील 15 शहरांतील 22 मल्टिप्लेक्सेसमधून दाखवले जाणार आहेत. फुटबॉल चाहते आता मुंबई, दिल्ली, गुरगाव, कोलकाता, पुणे, गोवा, भुवनेश्वर, जयपूर, सिलिगुरी, सुरत, इंदोर, बडोदा, धनबाद आणि त्रिसूरमधील आयनॉक्स मल्टिप्लेक्सेसमध्ये सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघू शकतात.
लाईव्ह सामने दाखवण्यासाठी आयनॉक्सने घेतलेल्या या पुढाकारामुळे फुटबॉल चाहत्यांना स्टेडियममध्ये असतं तसंच चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात सामने पाहता येणार आहेत. सिनेमा थिएटर्समधील चाहत्यांची गर्दी तसंच थिएटरच्या लॉबींमध्ये केलेल्या सजावटीमुळे फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकपच्या काही अविस्मरणीय आठवणी मिळणार आहेत. या जोडीला चाहत्यांना आयनॉक्सच्या भव्य अशा फूड-कॉम्बोजचा आणि चविष्ट खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. लाईव्ह सामने बघणाऱ्या चाहत्यांसाठी मल्टिप्लेक्सेस हे सर्व उपलब्ध करून देणार आहेत.
राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
Round of 16: Match- 5 | जपान विरुद्ध क्रोएशिया | 05 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल जनुब स्टेडियम |
Round of 16: Match- 6 | ब्राझील विरुद्ध कोरिया | 06 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | स्टेडियम 974 |
Round of 16: Match- 7 | स्पेन विरुद्ध मोरोक्को | 06 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
Round of 16: Match- 8 | पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड | 07 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
हे देखील वाचा-