एक्स्प्लोर

विराट शतक... टीम इंडियाची दणदणीत सुरुवात!

अँटिगा: कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियानं अँटिगा कसोटीच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं दिवसअखेर चार बाद 302 धावांची मजल मारली.   वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिगा कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. विराटनं कर्णधाराला साजेशा खेळ करुन भारताला पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांची वेस ओलांडून दिली.   वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीप्रमाणे विराटनं कसोटीतही आपला फॉर्म कायम राखला आहे. यंदाच्या वर्षातल्या आपल्या पहिल्याच कसोटीत विराटनं शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे.   विराटनं 197 चेंडूंतली नाबाद 143 धावांची खेळी सोळा चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे बारावं शतक ठरलं. विशेष म्हणजे विराटनं आपल्या बारा शतकांपैकी नऊ शतकं ही परदेशात लगावली.   अँटिगा कसोटीत विराटनं शतक झळकावून विंडीजमधला आपला धावांचा उपवासही सोडला. कारण 2011 सालच्या विंडीज दौऱ्यावरच विराटनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मालिकेत विराटला तीन कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 76 धावांच करता आल्या होत्या. पण त्याच विराट कोहलीनं पाच वर्षांनंतर विंडीजमध्ये शतक झळकावलं.   विंडीजमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली हा आजवरचा केवळ तिसराच भारतीय कर्णधार ठरला. याआधी कपिलदेव यांनी 1983 साली आणि राहुल द्रविडनं 2006 साली कर्णधार या नात्यानं विंडीजमध्ये शतक ठोकलं होतं. विराटनं आपल्या याच शतकी खेळीदरम्यान आणखी एक माईलस्टोन गाठला. विराटनं कसोटी कारकीर्दीत तीन हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्यानं आपल्या कारकीर्दीत 42व्या कसोटी सामन्यांच्या 73 डावांत ही मजल मारली. त्याशिवाय कर्णधार म्हणून खेळताना विराटनं एक हजार धावांचीही वेस ओलांडली आहे.   विराटनं आपल्या शतकी खेळीत तीन महत्त्वाच्या भागीदारी रचून टीम इंडियाला पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवून दिलं.   विराट कोहलीनं शिखर धवनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली. मग रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 57 आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी रचली.   अँटिगाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं धावत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. पण शिखर धवन मात्र यात अपयशी ठरला. चुकीचा फटका खेळण्याच्या नादात धवननं आपली विकेट गमावली. धवननं 147 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 84 धावांची खेळी उभारली.   भारतीय फलंदाजांना वेस्ट इंडिज दौऱ्यात यश मिळवायचं असेल तर, त्यांनी पराकोटीचा संयम दाखवण्याची गरज असल्याचं मत अजिंक्य रहाणेनं व्यक्त केलं होतं. पण विराटचा अपवाद वगळला तर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना संयमानं खेळणं काही जमलं नाही.   मुरली विजय सात, चेतेश्वर पुजारा सोळा आणि अजिंक्य रहाणे 22 धावांवर माघारी परतले. त्यामुळं आता अँटिगा कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत बनवायची असेल, तर टीम इंडियाच्या फलंदाजांना दुसऱ्या दिवशी संयमानं खेळण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget