एक्स्प्लोर
Advertisement
बेल्जियमचा ट्युनिशियावर 5-2 ने विजय, बाद फेरीत धडक
बेल्जियमने सलामीच्या सामन्यात पनामाचा 3-0 असा फडशा पाडला होता. त्यापाठोपाठ ट्युनिशियालाही हरवून, बेल्जियमने बाद फेरीत धडक मारली.
मॉस्को : बेल्जियमने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच गोल डागून, ट्युनिशियाचा 5-2 असा धुव्वा उडवला. बेल्जियमचा हा ग गटात सलग दुसरा विजय ठरला.
बेल्जियमने सलामीच्या सामन्यात पनामाचा 3-0 असा फडशा पाडला होता. त्यापाठोपाठ ट्युनिशियालाही हरवून, बेल्जियमने बाद फेरीत धडक मारली. या सामन्यात बेल्जियमकडून इडन हाझार्ड आणि रोमेलू लुकाकू यांनी प्रत्येकी दोन दोन गोल झळकावले.
इडन हाझार्डने सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर पहिल्या गोलची नोंद केली. रोमेलू लुकाकूने सोळाव्या मिनिटाला एक आणि पूर्वार्धाच्या एन्जुरी टाइममध्ये दुसरा गोल केला.
बेल्जियमचा पाचवा गोल मिची बॅटशुआयीने एन्जुरी टाइममध्ये डागला. ट्युनिशियाकडून डायलान ब्रॉनने अठराव्या आणि वाहबी काझरीने एन्जुरी टाइममध्ये एकेक गोल केला.
बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूने आतापर्यंत दोन सामन्यात सर्वाधिक चार गोल झळकावले आहेत. पहिल्या सामन्यात लुकाकूने झळकावलेल्या दोन गोलच्या आधारावर बेल्जियमने पनामावर 3-0 ने विजय मिळवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement