एक्स्प्लोर
अंडर-17 फिफा विश्वचषक : भारतानं सामना गमवला पण मनं जिंकली!
भारतानं अंडर-17 विश्वचषकातल्या दुसऱ्या साखळी सामन्यात आपली कामगिरी उंचावली, पण अखेर यजमानांना कोलंबियाकडून १-२ अशा पराभवाला सामोरं जावं लागलं.
नवी दिल्ली : भारतानं अंडर-17 विश्वचषकातल्या दुसऱ्या साखळी सामन्यात आपली कामगिरी उंचावली, पण अखेर यजमानांना कोलंबियाकडून १-२ अशा पराभवाला सामोरं जावं लागलं. या विश्वचषकातला भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवू न शकलेल्या भारतीय संघानं या सामन्यात मात्र कोलंबियाला जोरदार टक्कर दिली. या सामन्यात भारतीय संघाचा बचाव फारच चांगला होता. मध्यांतरापर्यंत कोलंबियाला एकही गोल करता आला नव्हता. तसंच गोलकीपर धीरज सिंहनं देखील काही गोल उत्कृष्टरित्या अडवले. म्हणूनच कोलंबियासाठी ही विजय फार सोपा नव्हता.
अमेरिकेनं सलामीच्या सामन्यात भारताचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यापाठोपाठ कोलंबियाकडून झालेल्या पराभवानं भारताचं विश्वचषकातलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आहे.
भारत आणि कोलंबिया संघांमधला सामना मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होता. कोलंबियाच्या युआन पेनालोझानं ४९व्या मिनिटाला बरोबरीची कोंडी फोडली. भारताच्या जीकसननं ८२व्या मिनिटाला गोल डागून भारताला पुन्हा बरोबरी साधून दिली. पण पुढच्याच मिनिटाला पेनालोझानं दुसरा गोल झळकावून भारतीयांच्या आनंदावर विरजण टाकलं.
जीकसन हा विश्वचषकात गोल झळकावणारा पहिला भारतीय फुटबॉलवीर ठरला, हीच या सामन्यात एक समाधानाची बाब ठरली.
भारताचा सलग दुसरा पराभव जरी झाला असला तरीही यावेळी खेळाडूंनी आपल्या खेळानं चाहत्यांची मनं मात्र नक्कीच जिंकली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement