एक्स्प्लोर
सट्टेबाजाने संपर्क केला होता का? मितालीला आयसीसीची विचारणा
आयसीसीची कोलकात्यात सध्या पाच दिवसीय बैठक सुरु आहे. त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला.
![सट्टेबाजाने संपर्क केला होता का? मितालीला आयसीसीची विचारणा Did You encounter Match fixing proposals ICC asks Mithali Raj सट्टेबाजाने संपर्क केला होता का? मितालीला आयसीसीची विचारणा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/26120133/mithaliraj2407-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
कोलकाता : मॅच फिक्सिंगसाठी कधी सट्टेबाजाने संपर्क साधला होता का, असा प्रश्न आयसीसीने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला विचारला. आयसीसीची कोलकात्यात सध्या पाच दिवसीय बैठक सुरु आहे. त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला.
मिताली राजला आयसीसीच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. ''या बैठकीत महिला क्रिकेटवर चर्चा झाली. काही वेळासाठी मिताली बैठकीला आली होती. तिला सट्टेबाजाने संपर्क साधला होता का प्रश्न विचारला. मात्र आतापर्यंत आपल्याला कुणीही संपर्क केला नसल्याचं तिने सांगितलं,'' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
आयसीसी सध्या महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात कव्हरेज देत असून महिला क्रिकेटचं प्रसारणही केलं जात आहे. त्यामुळे महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आयसीसी कडक पावलं उचलत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)