एक्स्प्लोर
धोनी 2019 विश्वचषकात खेळणार? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य
धोनीने अजून त्याचं निम्म क्रिकेटही खेळलेलं नाही, तो निश्चितच 2019 चा विश्वचषक खेळणार, असं शास्त्रींनी म्हटलं आहे.

कोलंबो : टीम इंडियाचा माजी कर्णधार इंग्लंडमध्ये होणारा 2019 चा विश्वचषक खेळणार का, याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. धोनीने अजून त्याचं निम्म क्रिकेटही खेळलेलं नाही, तो निश्चितच 2019 चा विश्वचषक खेळणार, असं शास्त्रींनी म्हटलं आहे. 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात नवनवीन प्रयोग आणि रोटेशन पॉलिसीचा वापर केला जात आहे. ज्यामध्ये धोनी फिट बसतो. धोनीचा भारतीय संघावर प्रभाव आहे, तो ड्रेसिंग रुममधील 'लिव्हिंग लिजेंड' आहे आणि त्याचा सर्व जण आदर करतात, असं रवी शास्त्री म्हणाले. धोनी भारताचा बेस्ट विकेटकीपर आहे. कारण तो गेल्या कित्येक वर्षांपासून खेळत आहे. तुम्ही त्याची जागा इतर कुणाला देण्याचा विचारही करु शकत नाही, असंही रवी शास्त्री म्हणाले. तुम्ही सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या जागी कुणाला आणू इच्छित होतात का, जेव्हा ते 36 वर्षांचे होते? मग धोनीच्या बाबतीत असा विचार का करता, तो त्याच्या जागी फिट आहे, असंही रवी शास्त्रींनी ठणकावलं.
आणखी वाचा























