एक्स्प्लोर

चेन्नई सुपरकिंग्जमध्ये परतण्यासाठी धोनी आतुर

सीएसकेही आता आयपीएलच्या नव्या मोसमात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसकेचा तत्कालीन कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी पुन्ही सीएसकेकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. या गोष्टीची त्याने फक्त माहितीच दिली नाही, तर एक पिवळ्या रंगाचा बोलका फोटो शेअर केला आहे.

रांची : मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयने आयपीएलमधील दोन महत्वाचे संघ चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली होती. दोन वर्षाच्या बंदीनंतर आता हे दोन्हीही संघ नव्या आयपीएल मोसमासाठी सज्ज झाले आहेत. 2015 साली घालण्यात आलेली बंदी अखेर संपली आहे. सीएसकेही आता आयपीएलच्या नव्या मोसमात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसकेचा तत्कालीन कर्णधार आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी पुन्ही सीएसकेकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. या गोष्टीची त्याने फक्त माहितीच दिली नाही, तर एक पिवळ्या रंगाचा बोलका फोटो शेअर केला आहे. धोनीच्या टी शर्टवर 7 हा त्याचा लकी नंबर लिहिलेला आहे. आणि फोटोला 'थला' म्हणजे बॉस अशी कॅप्शन दिली आहे. धोनीने शेअर केलेला फोटो हा त्याच्या नव्या घरासमोरचा असल्याचं बोललं जात आहे. सीएसकेवर बंदी घालण्यात आल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुंपरजायंटच्या ताफ्यात सहभागी झाला होता. मात्र 2016 साली पुणे संघ प्ले ऑफमधूनच बाहेर पडला. ज्यानंतर 2017 च्या मोसमासाठी धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं. धोनीने आयपीएलच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 2008 पासून ते 2015 पर्यंत सीएसकेचं कर्णधारपद सांभाळलं. आता सीएसकेचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीकडे कर्णधारपदाची धुरा जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सीएसकेवरील बंदी अधिकृतपणे संपली आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं तोच स्टाफ आणि त्याच खेळाडूंसोबत पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न करु. बीसीसीआयने पुन्हा त्याच खेळाडूंना परत घेण्याची परवानगी दिली, तर धोनीच कर्णधार असेल, असंही सीएसकेने स्पष्ट केलं आहे. धोनीसोबत अजूनपर्यंत चर्चा केलेली नाही. कारण त्याचा पुण्यासोबत असलेला करार या वर्षाअखेरपर्यंत संपणार आहे. त्यानंतर धोनीशी चर्चा केली जाईल, असंही सीएसकेने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget