एक्स्प्लोर

IPLचा मराठमोळा हिरो, ऋतुराज गायकवाडची कमाल, ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार?

IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. यात विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं.

IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. यंदा भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. यात विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं. ऋतुराज सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आता त्याला केवळ 23 धावांची गरज आहे. अंतिम सामन्यात तो या यशाला नक्कीच गवसणी घालेल.

IPL 2021 : ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाजीच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

आयपीएलमध्ये सर्वाधिक 626 धावा पंजाबचा कर्णधार केएल राहुलने केल्या आहेत, सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर 603 धावा बनवून ऋतुराज दुसऱ्या नंबरवर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 551 धावा करत दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या स्थानी आहे. ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही 22 षटकार लगावत दुसऱ्या स्थानी आहे. तर सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या यादीतही तो 61 चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. 

Qualifier 1: दिल्लीला पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक! CSK विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरीत!

काल दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यातही ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 70 धावा केल्या. 

आरसीबीचा वेगवान गोलंदाज  हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 13 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत तर  आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 21 विकेट्स घेतल्या आहेत.  मोहम्मद शामीनंही 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीप सिंह आणि शार्दूल ठाकूरनं 18-18 विकेट्स घेतल्या आहेत. 

केएल राहुल सिक्सर किंग 
षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासह 30 षटकार ठोकत यादीत पहिले स्थान मिळवले आहे. राहुल नंतर मॅक्सवेल 21 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामात आतापर्यंत 20 षटकार ठोकले आहेत. प्लेसिसनं देखील 20 षटकार ठोकले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special ReportABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget