IPL 2021 : ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाजीच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा
IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये चार भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत.
IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये 626 धावा बनवून पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे ऑरेंज कॅप आहे. तर चेन्नईचा फाफ डू प्लेसिस 546 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 544 धावा करत दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या तर 533 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 13 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत तर आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 21 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शामीनंही 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीप सिंह आणि शार्दूल ठाकूरनं 18-18 विकेट्स घेतल्या आहेत.
केएल राहुल सिक्सर किंग
षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासह 30 षटकार ठोकत यादीत पहिले स्थान मिळवले आहे. राहुल नंतर मॅक्सवेल 21 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामात आतापर्यंत 20 षटकार ठोकले आहेत. प्लेसिसनं देखील 20 षटकार ठोकले आहेत.
मुंबईचा प्ले ऑफचा रस्ता कठिण
परवा इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे खेळलेल्या IPL 2021 च्या 54 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी पराभव केला होता. यासह, केकेआरने प्लेऑफसाठी आपला दावा भक्कम केला आहे. कोलकात्याचे 14 गुण आहेत तर मुंबईनं कालचा सामना जिंकून आपले 14 गुण केले मात्र नेट रनरेटच्या आधारावर कोलकाता प्ले ऑफसाठी पात्र ठरला. दिल्ली 20 अंकांसह टॉपवर आहे तर चेन्नई 18 अंकांसह नंबर दोनवर आहे तर बंगळुरुचेही 18 अंक असून तिसऱ्या नंबरवर आहे. तर कोलकाता 14 अंकांसह चौथ्या नंबरवर आहे.