एक्स्प्लोर
लिलावात सीएसकेची नजर अश्विनवर राहिल : धोनी
यंदा अकराव्या आयपीएलच्या निमित्तानं आठही संघांची नव्याने बांधणी होणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सची नजर ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन राहिल, अशी कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दिली आहे. यंदा अकराव्या आयपीएलच्या निमित्ताने आठही संघांची नव्याने बांधणी होणार आहे.
चेन्नईने कर्णधार धोनीसह सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजा या प्रमुख शिलेदारांना आपल्या ताफ्यात कायम राखलं आहे. यानंतर आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संघात घेण्याची संधी ही आयपीएलच्या लिलावात मिळणार आहे. या लिलावात अश्विनला विकत घेण्यासाठी चेन्नईची चढा भाव देण्याची तयारी असल्याचं धोनीने स्पष्ट केलं.
यंदाच्या आयपीएल मोसमासाठी होणाऱ्या लिलावात एकूण 1122 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावात आपल्या नावाचा समावेश करण्यासाठी 12 जानेवारी ही अखेरची तारीख होती. भारतासह जगभरातील 1122 खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत.
विविध राष्ट्रीय संघातील 281 आणि 838 युवा खेळाडूंचा यात समावेश असेल, ज्यामध्ये भारतातील 778 युवा खेळाडू असतील, तर इतर देशांमधील तीन खेळाडू आहेत. 27 आणि 28 जानेवारीला बंगळुरुत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement