एक्स्प्लोर
क्रिकेटर विजय झोल अर्जुन खोतकरांच्या मुलीशी विवाहबंधनात
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली.
जालना : भारतीय अंडर 19 संघाचा माजी कर्णधार विजय झोल आज नववर्षाच्या मुहूर्तावर लग्न बंधनात अडकला. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली.
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह जालना येथे पार पडला. मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि दर्शनाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त साधत हे जोडपं विवाहबद्ध झालं.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवस्थानीच काही मुख्य पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान आज या नव दाम्पत्याला आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
भारत
बॉलीवूड
Advertisement