एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून मला तुझा अभिमान, उत्थप्पाकडून पत्नीचा फोटो शेअर
आपल्या देशातील संस्कृती आणि समजांमुळे महिलांच्या मनात प्रेग्नंसीबाबत जी भीती आहे, ती दूर करण्यासाठी मी माझ्या पत्नीला यावर एक पुस्तक लिहिण्यास सांगत होतो. या काळात तिने समाजातील अनेक प्रस्थापित समज तोडले आहेत, असं क्रिकेटपटू रॉबिन उत्थप्पा पत्नी शीतलबाबत म्हणतो.
मुंबई : टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज रॉबिन उत्थप्पा लवकरच बाबा होणार आहे. उत्थप्पाने पत्नी शीतलचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपल्याला तिचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'जर कोणाला आई व्हायचं असेल, तर ती ही आहे. मला माझ्या पत्नीच्या गर्भावस्थेच्या प्रवासाचा अभिमान वाटतो. आपल्या देशातील संस्कृती आणि समजांमुळे महिलांच्या मनात प्रेग्नंसीबाबत जी भीती आहे, ती दूर करण्यासाठी मी माझ्या पत्नीला यावर एक पुस्तक लिहिण्यास सांगत होतो. या काळात तिने समाजातील अनेक प्रस्थापित समज तोडले आहेत. आय लव्ह यू स्वीटहार्ट. मला खात्री आहे की तू एक अद्भूत आई होणार आहेस' असं रॉबिनने लिहिलं आहे.
क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
उत्थप्पा या मौसमात कर्नाटक प्रिमियर लीग (केपीएल) मध्ये सहभागी होणार नाही. याबाबत अनेक चर्चांना उधाण आल्यानंतर त्याने सोशल मीडियावरच त्यांना पूर्णविराम दिला. 'मी केपीएल का खेळत नाही, असा प्रश्न अनेक जण मला विचारत आहेत. माझी पत्नी लवकरच आई होणार आहे. आम्ही त्याबाबत प्रचंड उत्साहात आहोत. त्यामुळे मला शीतलसोबत काही वेळ व्यतीत करायचा आहे. जेव्हा ती आई होईल, तेव्हा मला तिच्यासोबत राहायचं आहे. मला येणाऱ्या बाळासाठी घर तयार करायचं आहे.' असं रॉबिन म्हणतो.रॉबिन आणि शीतलचं मार्च 2016 मध्ये लग्न झालं होतं. हे त्यांचं पहिलं अपत्य असणार आहे. काही दिवसांपूर्वीचं दोघंही अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करुन आले होते. रॉबिन उथप्पानं टीम इंडियासाठी 46 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळले असून दोन्हीमध्ये मिळून आतापर्यंत 1000 धावा केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement