एक्स्प्लोर

शमीच्या अडचणी वाढल्या, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विश्वचषकादरम्यान सुनावणी

मागील वर्षी हसीन जहांने शारीरिक अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप करत शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शमीविरोधात भारतीय दंडविधान कलम 498 अ अंतर्गत हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीची पत्नी हसीन जहांच्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. मागील वर्षी हसीन जहांने शारीरिक अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप करत शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमी भारतीय संघातील खेळाडू आहे. आगामी विश्वचषकासाठी त्याच्याही नावाची चर्चा आहे. त्यात आता हसीन जहांच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्याच्या विश्वचषक तयारीवर परिणाम होऊ शकतो. शमीविरोधात कलम 498 अ आणि त्याचा भाऊ हसीब अहमदवर 498 अ आणि 354 अ अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाने शमीला समन्स बजावला असून त्याला 22 जून रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितल्याचं पोलीस म्हणाले. परंतु विश्वचषकादरम्यान सुनावणीसाठी हजर राहणं शमीसाठी काहीसं अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. हसीन जहां म्हणाली की, "पोलिसांनी आयपीसीच्या कलम 498 अ (हुंड्यासाठी छळ) आणि 354 (लैंगिक छळ) अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं आहे. हसीनने याआधीही शमीवर कौटुंबिक हिंसाचार, विवाहबाह्य संबंधांपासून मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता." मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांची आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या पार्टीत भेट झाली होती. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोन वर्षांनी 7 एप्रिल 2014 रोजी शमी आणि जहांचं लग्न झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget