Taipei Open 2022: इशान भटनागर- तनिषा क्रास्टो जोडीची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक!
Taipei Open 2022: तैपेई ओपन 2022 स्पर्धेच्या राउंड ऑफ 32 च्या सामन्यात भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीनं मिशा झिलबरमन-स्वेतलाना झिलबरमन यांचा पराभव केलाय.
Taipei Open 2022: तैपेई ओपन 2022 स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 च्या सामन्यात भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो (Ishaan Bhatnagar-Tanisha Crasto) यांच्या जोडीनं मिशा झिलबरमन-स्वेतलाना झिलबरमन (Misha Zilberman and Svetlana Zilberman) यांचा पराभव केलाय. या सामन्यात इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टोनं 21-15, 21-8 असा विजय मिळवत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केलाय. या विजयासह भारतानं तैपेई ओपनमधील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 47व्या क्रमांकाची जोडीनं दमदार कामगिरी केलीय.
पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीची दमदार कामगिरी
भारतीय जोडीनं पहिल्या गेममध्ये ताबडतोब आघाडी घेतली होती. त्यावेळी इस्रायलच्या जोडीनंही चुरशीची लढत दिली. मात्र, भटनागर आणि क्रेस्टो यांनी दमदार कामगिरी बजावत आघाडी कायम ठेवली. या सेटमध्ये इस्त्रायली जोडीला गुण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. अखेर भारतीय जोडीनं पहिला सेट 21-15 असा जिंकला.
दुसऱ्यामध्येही भारतीय जोडी पडली भारी
दुसऱ्या गेममध्येही भारतीय जोडीनं मिशा आणि स्वेतलानावर वर्चस्व गाजवलं. 11-4 अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय जोडीनं मागं वळून पाहिलं नाही. त्याच वेळी, पुन्हा एकदा मीशा आणि स्वेतलाना जोडीला गुण गोळा करणे खूप कठीण झालं. भारतीय जोडीनंही इस्त्रायली जोडीला पुनरागमनाची संधी न देता हा सेट 21-8 नं जिंकला.
इशान-तिनिषा पुढचा सामना कोणाशी?
सहाव्या मानांकित इशान आणि तनिषाचा पुढील सामना चेंग काई वेन आणि वांग यू किआओ किंवा चुन हसीन यांग आणि सू यिन-हुई या चायनीज तैपेई जोडीशी होईल.
हे देखील वाचा-
- Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा विरुद्ध धनकड; उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
- Covid-19 : देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, 15 हजार 528 नवे रुग्ण, 25 रुग्णांचा मृत्यू
- Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी, जनजीवन विस्कळीत; अनेक संसार ढिगाऱ्याखाली