Covid-19 : देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, 15 हजार 528 नवे रुग्ण, 25 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Corona New Cases in India : देशातील कोरोना संसर्गात काहीशी घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 528 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद आणि 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी सलग चार दिवस वीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण
सोमवारी दिवसभरात महाराष्ट्रात 1111 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 1474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक म्हणजे 176 रुग्णांची भर पडली आहे.
India records 15,528 new COVID19 cases today; Active caseload at 1,43,654 pic.twitter.com/VgTiwGrYp6
— ANI (@ANI) July 19, 2022
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ
देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. भारतात सध्या 1 लाख 43 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 785 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkeypox Case : केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1111 कोरोना रूग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.97 टक्के
- Maharashtra Corona Update : राज्यात बी ए. 4 , बी ए. 5 व्हेरीयंटचे 19 रुग्ण तर बी. ए 2.75 चे 17 रुग्ण तर 2186 नव्या रुग्णांची नोंद