एक्स्प्लोर

Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा विरुद्ध धनकड; उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Vice President Candidate : यूपीएच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.

Vice President Candidate : भारताच्या नव्या उपराष्ट्रपती पदाच्या (Vice President) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना संयुक्त उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मार्गारेट अल्वा (Margaret Alva) आज दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी सोमवारी एनडीएचे (NDA) उमेदवार जगदीप धनकड (Jagdeep Dhankhad) यांनी अर्ज दाखल केला. धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि यूपीएकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एनडीएपाठोपाठ काल (सोमवारी) यूपीएनंही उमेदवाराच्या नावाची घोणा केली. मार्गारेट अल्वा यांना यूपीएकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीत शरद पवार यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तत्पूर्वी भाजपप्रणित एनडीएकडून काल जगदीप धनकड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. 

लोकसभा आणि राज्यसभेत भाजप बहुमतात असल्यानं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षपदी धनकड यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. संसदेच्या सध्याच्या 780 सदस्यांपैकी एकट्या भाजपकडे 394 सदस्य आहेत आणि ही संख्या 390 च्या बहुमतापेक्षाही जास्त आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार असून नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

'काँग्रेस पक्षाला चोर घोषित केलेलं नाही'

दुसरीकडे, विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी सोमवारी सांगितलं की, मी एनडीएचा प्रचार करणार आहे. मी कोणाला घाबरणार नाही. दुसरीकडे, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक बातमी ट्वीट करून म्हटलं आहे की, विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी त्यांच्या पुस्तकात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चोरीपासून कटापर्यंतची कहाणी लिहिली आहे. त्याचं समर्थन करून, कुठेतरी विरोधकांनी काँग्रेस पक्षाला चोर घोषित तर केलं नाही ना?

मार्गारेट अल्वा उत्तम उमेदवार : मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khadge) यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Candidate) मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्याबाबत बोलताना मार्गारेट अल्वा या उत्तम उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. 1974 पासून त्या सातत्यानं राजकारणात आहेत. त्या 5 वेळा खासदार, 4 राज्यांच्या राज्यपाल, केंद्रात मंत्री राहिल्या आहेत. मग यापेक्षा चांगले काय असेल? अल्वा यांना 18 पक्ष मिळून पाठिंबा देतील, असंही ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Kesari 2025 : 16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
Share Market : बजेट दिवशी अपेक्षाभंग,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? हे 'तीन' घटक प्रभावी ठरणार
बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pruthviraj Mohol Maharashtra Kesari| वडिलांचे स्वप्न साकार,महाराष्ट्र केसरी मोहोळची प्रतिक्रियाMaha Kumbh 2025 | प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात विदेशी भाविक दाखल, म्हणाले... ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 03 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPruthviraj Mohol  wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Kesari 2025 : 16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
Share Market : बजेट दिवशी अपेक्षाभंग,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? हे 'तीन' घटक प्रभावी ठरणार
बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, युवराज सिंग म्हणाला तुझा अभिमान वाटतो, युवा खेळाडू म्हणतो, ते आनंदी....
मला तुझा अभिमान वाटतो, युवराज सिंगचं शिष्याच्या फटकेबाजीवर ट्विट, अभिषेक शर्मा म्हणाला युवी पाजी आनंदी असतील...
RBI : अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला दिलासा, आता आरबीआय कर्जदारांसाठी मोठा निर्णय घेणार? लवकरच बैठक
केंद्रानं 12 लाखांपर्यंत कर सवलत दिली, आता आरबीआयकडे मध्यमवर्गाचं लक्ष, रेपो रेट बदलणार?
Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Embed widget