(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी, जनजीवन विस्कळीत; अनेक संसार ढिगाऱ्याखाली
Himachal Pradesh Cloudburst : ढगफुटीनंतर अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. नागरिकांचं सुरक्षित भागात स्थलांतर करण्यात आलं आहे.
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमधील शलखर गावात सोमवारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. ढगफुटीमुळे मोठा पूर येऊन दुर्घटना घडली. या पुरात जीवितहानी झालेली नाही. पण अनेक वाहनं प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. तर इतर ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. पुराच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर याचं वास्तव समोर आलं. ढगफुटीमुळे डोंगरावरून पुराचं पाणी वेगानं शलखर गावात घुसलं. यामुळे भरपूर नुकसान झालं आहे.
पुरात सर्व काही वाहून गेलं
ढगफुटीमुळे पूर आल्याने शलखर गावातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले. पुरात सर्व काही वाहून गेलं. पूर आलेल्या ठिकाणी विध्वंस पाहायला मिळतोय. सामडो चेक पोस्चपासून पूहच्या दिशेने सुमारे सात किलोमीटर अंतरावर ही ढगफुटीची दुर्घटना घडली आहे. निसर्गाच्या कोपामुळे अनेकांची घरं वाहून गेली. सुदैवानं लोकांचे प्राण वाचले. पण ढिगाऱ्याखाली अनेक संसार अडकले आहेत.
Kinnaur, Himachal Pradesh | Cloudburst in Shalkhar village, Hanrang sub-tehsil. Small water canals and some vehicles buried. Damage incurred by some houses too: DEOC Kinnaur pic.twitter.com/lx31oYQQgA
— ANI (@ANI) July 19, 2022
ढिगाऱ्याखाली अनेक वाहनं अडकली
पुरामुळे परिसरातील मंदिरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली आणि चिखलामध्ये अडकल्या आहेत. पूर ओसरला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra Rain : विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी
- ST News : राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनच महामंडळाची फसवणूक? अनधिकृत बस थांबे सुरू
- Maharashtra Politics : मुख्यमंत्री दिल्लीत, पंतप्रधानांची घेणार भेट; शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट आजच होणार?
- Nagpur News : नागपुरात भंगार गोदामात स्फोट, एक जण ठार तर एक जखमी