एक्स्प्लोर

Year Ender 2022: क्रिकेट जगतासाठी अतिशय दु:खदायक ठरलं 2022; आधी वॉर्न-सायमंड्सनं जग सोडलं, आता पंतच्या कारला भीषण अपघात!

Year Ender 2022: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला.

Year Ender 2022: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. तसं पाहिलं यंदाचं वर्ष क्रिकेट जगतासाठी दु:खदायक ठरलं. याच वर्षी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि  अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) सारख्या दिग्गज खेळाडूंनी अकाली जगाचा निरोप घेतला. 

शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू (4 मार्च 2022)
महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचं 4 मार्च रोजी थायलंडमधील कोह सामुई येथे त्याचे हृदयविकाराचा झटका निधन झालं. 52 वर्षीय शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

शेन वॉर्नची कारकीर्द
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन (14 मे 2022)
ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याच वर्षी 14 मे कार अपघातात मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविलेच्या पश्चिमेला त्याच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र, उपचारादरम्यान त्याची प्रााणज्योत मालवली. 

अँड्रयू सायमंड्सची कारकिर्द
जगातील अव्वल दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूंची जेव्हाही यादी बनेल त्यात सायमंड्सचं नाव नक्कीच वरच्या फळीत असेल. सायमंड्सचं क्रिकेट करिअर अतिशय शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 रन बनवले. यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्ध शतकांचा समावेश आहे. सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू असल्याने त्याने वनडे फॉर्मेटमध्ये त्याने 133 विकेटही घेतल्या. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.  

पंतच्या कारचा भीषण अपघात (30 डिसेंबर 2022)
भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला काल भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मनोज जरांगे आक्रमकUddhav Thackeray : वायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची मशाल! ठाकरे EXCLUSIVEABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Embed widget