एक्स्प्लोर

Cricketers Accident: अपघातानंतर 'या' पाच क्रिकेटर्सनी दणक्यात केलं कमबॅक, वाचा सविस्तर

Rishabh Pant: अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Rishabh Pant Car Accident Video: क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला... या अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या ट्विटनुसार, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे.  चेहऱ्यावरील जखमांसह इतर जखमा आणि ओरखड्यांवर डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी  देखील केली असल्याची माहिती आहे. उद्या शनिवारी ऋषभ पंतचा घोटा आणि गुडघ्याचा एमआरआय होणार आहे. ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी खूप मोठा कालवाधी लागणार आहे. पुढील काही दिवस ऋषभ पंत मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. पण चाहते ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत आहे. ऋषभ लवकर मैदानावर परतावा यासाठी क्रीडा चाहते प्रार्थना करत आहे. ऋषभ पंत आधी पाच क्रिकेटपटूंनी अपघातानंतर मैदानावर पुनरागमन केलेय. पाहूयात या पाच क्रिकेटपटूंबद्दल....  

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा 2018 साली अपघात

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा 2018 साली देहरादून ते दिल्ली दरम्यान प्रवासात कारचा अपघात झाला होता. मोहम्मद शमीच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर टाके देखील घालावे लागले होते. या अपघातातून सावरुन शमीने पुन:श्च जोरदार कमबॅक केलं होतं. 

श्रीलंकेच्या फिरकीपटूने एका महिलेला ठोकर मारली होती

श्रीलंकेचा फिरकीपटू कौशल लोकुराच्ची याचा सुद्धा भयानक अपघात झाला होता. 2003 साली एप्रिल महिन्यात त्याने पदापर्ण केलं होतं आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या खांद्याला मार लागला होता. कौशलचा हा अपघात एवढा भयानक होता की या कार दुर्घटनेत एका महिलेचा जीवा गेला. या घटनेनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कौशलला बडतर्फ केलं होतं. पण यासगळ्यावर मात करत कौशलने संघात पदापर्ण केलं खप पण 2012 साली त्याने आयुष्यातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडींचाही कार अपघात

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांचाही कारचा अपघात झाला होता. वयाच्या 20 व्या वर्षी पतौडींच्या गाडीला अपघात झाला होता ज्यामध्ये
त्यांच्या उजव्या डोळ्याला जखम झाली आणि यानंतर त्यांच्या दृष्टी अधू झाली होती. परंतू या सगळ्याचा त्यांचा क्रिकेट खेळावर काहीच परिणाम झाला नाही. दुखापतीतून सावरुन ते क्रिकेट मैदानात पुन्हा त्याच फॉर्ममध्ये खेळताना दिसले.

साईराज बहुतुलेच्या पायात रॉड

मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध खेळाडू साईराज बहुतुले. साईराज यांचं वय 17 वर्ष असताना मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात आपल्या मित्रांच्यासोबत
कारने जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात साईराज यांचा एक मित्र मृत्यूमुखी पडला तर साईराज यांच्या पायाचा ऑपेरश करुन त्यात रॉड घालण्याची वेळ आली. इतक्या भीषण अपघातानंतर साईराजने जिद्द सोडली नाही. अपघातातून सावरुन साईराज पुन्हा मैदानात परत आला आणि भारतासाठी खेळतानाही दिसला.

सुनील गावस्कर यांचाही 2014 साली अपघात

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा 2014 साली अपघात घडला होता. गावस्कर लंडनमधून मॅन्चेस्टरला जात असताना त्यांच्या कारच्या ड्रायव्हरला झोप आली आणि अपघात घडला. सुदैवाची गोष्ट म्हणजे गावस्करांना यामध्ये कुठलीही गंभीर अशी दुखापत झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget