Yashasvi Jaiswal : नको तेच घडलं, जैस्वाल 175 धावांवर RUNOUT, यशस्वी शुभमनवर संतापला, बोल बोल बोलला, गिल पाहत बसला, VIDEO
Yashasvi Jaiswal Run-Out IND vs WI 2nd Test VIDEO : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल नको तेच घडलं.

Yashasvi Jaiswal Run-Out IND vs WI 2nd Test VIDEO : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI 2nd Test Day 2) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) नको तेच घडलं. यशस्वी जैस्वाल आपल्या दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर असताना दुर्दैवीरित्या रनआऊट झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने 2 बाद 318 अशी दमदार मजल मारली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासात यशस्वी जैस्वाल रनआऊट झाला.
Mindless running from Jaiswal after hitting straight to fielder resulting in run out.
— Prateek (@prateek_295) October 11, 2025
He did the same thing in Melbourne too when he was batting with Virat Kohli.
Bottled an easy 100 there & now a 200 here#YashasviJaiswal #INDvWI #TeamIndia pic.twitter.com/BvKygFeKUL
यशस्वी जैस्वाल अन् शुभमन गिलमध्ये नेमकं काय घडलं?
भारताच्या पहिल्या डावातील 91व्या षटकात यशस्वीने एक शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी शुभमन गिलला (Shubman Gill) इशारा दिला. तो अर्ध्या पिचपर्यंत पोहोचला होता, पण त्याच क्षणी गिल मागे फिरला. त्यामुळे यशस्वी क्रीजच्या बाहेर राहिला आणि थेट रनआऊट झाला. तो फक्त 25 धावांनी दुहेरी शतकापासून दूर राहिला. यशस्वीने 258 चेंडूत 22 चौकारांसह 175 धावांची अप्रतिम खेळी साकारली. पण रनआऊट झाल्यानंतर तो स्पष्टपणे संतापलेला आणि निराश दिसत होता. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये तो गिलकडे बघत काही बोलताना दिसला, आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
A great start for #TeamIndia in the second Test against West Indies! Yashasvi Jaiswal's brilliant innings ended on 175 runs after being run out on the second day in Delhi, just shy of a double century.#INDvsWI #YashasviJaiswal #TestCricket #CricketNews #ArunJaitleyStadium pic.twitter.com/xbHfeaxIOm
— Hardik Shah (@Hardik04Shah) October 11, 2025
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढल्यानंतर धावबाद होण्याचा दुर्दैवी विक्रम संजय मांजरेकर यांच्या नावावर आहे. आता ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 1989 मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध तो 218 धावा काढून धावबाद झाला होता. राहुल द्रविडचे नाव या यादीत तीन वेळा आले आहे.
भारतासाठी सर्वाधिक धावा काढल्यानंतर धावबाद होणारे खेळाडूं
- 218 संजय मांजरेकर विरुद्ध पाकिस्तान लाहोर 1989
- 217 राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड द ओव्हल 2002
- 180 राहुल द्रविड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकाता 2001
- 175 यशस्वी जयस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज दिल्ली 2025
- 155 विजय हजारे विरुद्ध इंग्लंड मुंबई 1951
- 144 राहुल द्रविड विरुद्ध श्रीलंका कानपूर 2009
हे ही वाचा -





















