Ladki Bahin Yojana Politics : लाडकी बहीण वरून टोले, मुख्यमंत्री फडणवीसांचे शोले Special Report
गेले वर्षभर राज्यात कोणताही विषय असला की तो लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची प्रथा सुरु झाली आहे. सत्ताधारी असो की विरोधक, आमदार असो की मंत्री.. मुद्दा चांगला असो की वाईट.. बोलण्याच्या ओघात लाडक्या बहिणीचा उल्लेख येतोच. त्याला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी कडक शब्दात समज दिली. काय घडलं नेमकं? पाहुयात.
लोकसभेच्या धक्क्यानंतर महायुती सावरली...
विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं...
भाऊ-भाई आणि दादांचं सरकार पुन्हा आलं...
महाविकास आघाडीला ५० जागासुद्धा मिळाल्या नाहीत...
हा सगळा चमत्कार कुणी केला तर तो लाडक्या बहिणींनी...
त्यामुळे लाडकीमुळे तिजोरीवर भार पडला असला तरी...
ती योजना सत्ताधाऱ्यांसाठी जीव की प्राण आहे...
लाडकीवरचे आक्षेप सत्ताधाऱ्यांना सहन होत नाहीत...
अधिवेशनात काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी ही योजना महिला सुरक्षेशी जोडायचा प्रयत्न केला...
त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली...
विरोधकांना समज देऊन मुख्यमंत्री थांबतात न थांबतात तोच
भाजपच्याच आमदाराला खडसावण्याची वेळ त्यांच्यावर आली...
लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचा नूर समजून घेण्यात
त्यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले अभिमन्यू पवार कमी पडले...
त्यांनी आपल्या भाषणात अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला...
आणि तात्काळ फडणवीसांच्या रोषाला सामोरं जावं लागलं...
आपल्याच लाडक्या आमदाराची मुख्यमंत्र्यांनी कशी खरडपट्टी काढली ते ऐका...
पण लाडक्या बहिणींबद्दलची मुख्यमंत्र्यांची तळमळ विधान परिषदेत त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत मात्र पोहोचलेली दिसली नाही...
कारण तिथे विषय सुरू होता परदेश दौऱ्याचा... आणि त्यात मंत्री परिणय फुके यांनी लाडक्या बहिणीचा उल्लेख केलाच...
एकिकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा काहींनी कसा गैरफायदा घेतला ते सुद्धा सरकारने सभागृहासमोर मांडलं...
लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी
- बोगस लाभार्थ्यांमुळं सरकारचं ३२ कोटींचं नुकसान
- १४ हजार २९७ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला
- २६ लाख अपात्र महिलांनी लाभ घेतला
- अपात्र लाभार्थ्यांमध्ये साडे नऊ हजार शासकीय कर्मचारी
- शासकीय कर्मचारी, पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल करणार
हे झालं सरकारचं...
पण सरकारला वर्ष उलटला तरी विरोधकांच्या डोक्यातूनही लाडकी जायला तयार नाहीय...
राज्यात कोणताही प्रश्न असला की तो लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची प्रथाच पडलीय...
ज्या योजनेनं आपल्याला सत्ता मिळवून दिली तिचं नाव नकारात्मक गोष्टींशी सतत जोडली जात असल्यानं मुख्यमंत्री वैतागले असावेत...
विरोधी आमदार तर लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राहणार मात्र स्वपक्षीय आमदार, आणि त्यांच्याच पक्षाचे, मित्रपक्षाचे मंत्री या सर्वांना समजावून सांगण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागतेय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर
All Shows

































