एक्स्प्लोर

WTC Final Rahul Dravid: ICC ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियावर दबाव? WTC फायनलपूर्वी हेड कोच द्रविड म्हणतो...

Team India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा अजिंक्य रहाणेवर असणार आहेत.

WTC Final 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.

अंतिम सामन्याच्या दोन दिवस आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. यादरम्यान द्रविडनं ठणकावून सांगितलं की, टीम इंडियावर आयसीसीचं विजेतेपद मिळविण्याचं कोणतंही दडपण नाही. द्रविडनं मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेचंही पत्रकार परिषदेत बोलताना कौतुक केलं. दरम्यान, टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. 2021 साली साउथॅम्प्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

हे दोन वर्षांच्या मेहनतीचं फळ : राहुल द्रविड 

राहुल द्रविड म्हणाला की, "अजिबात नाही... आयसीसी ट्रॉफीबाबत आम्हाला कोणतंही दडपण वाटत नाही, अर्थातच ट्रॉफी जिंकणं अत्यंत आनंददायी असेल. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यास पात्र असणं हेदेखील अत्यंत आनंददायी आहे. हे दोन वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, जे टीम इंडियाला इथपर्यंत घेऊन आलं आहे. यादरम्यान अनेक सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्यात. ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणं, तसेच इंग्लंडमध्ये मालिका अनिर्णित ठेवणं."

"हा संघ गेल्या 5-6 वर्षांत जगभर खेळला आहे. आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे आतापर्यंत मिळवलेलं यश बदलणार नाही. पण, यावेळी कसोटी चॅम्पियनशिप जिंकणं अत्यंत आनंददायी असेल. क्रिकेटमधील कोणताही खेळ असो, तो जिंकायचाच असतो. WTC फायनल दरम्यान तुमच्या बाजूनं निकाल मिळणं खूपच उत्तम असेल.", असं राहुल द्रविड म्हणाला. 

अंतिम सामन्याआधी क्रिकेट तज्ज्ञही आपला आवडता संघ निवडत आहेत. काही लोक टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार असल्याचं म्हणत आहेत, तर काही तज्ज्ञांनी कांगारूंना फेव्हरेट म्हटलं आहे. याबाबत बोलताना द्रविड म्हणाला की, "जे काही होईल, ते येत्या 5 दिवसांत होईल. त्याआधी जे काही बोललं जात आहे, त्याला काही अर्थ नाही. दोन चांगले संघ खेळत आहेत आणि दोघांकडे काही चांगले खेळाडू आहेत. जर आपण चांगलं खेळलो आणि 20 विकेट्स घेण्याबरोबरच धावा केल्या तर मला खात्री आहे की आपण वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल नक्कीच जिंकू."

रहाणे स्लिपमध्ये उत्तम : राहुल द्रविड

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविडनं अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राहुल द्रविड म्हणाला की, "यंदा संघात अजिंक्य रहाणे असणं अत्यंत उत्तम आहे. तसेच टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. काही खेळाडू दुखापग्रस्त झाले आहेत, कदाचित त्यामुळेच अजिंक्यला संघात पुन्हा स्थान मिळालं आहे. पण तरीही त्याच्यासारखा खेळाडू संघात असणं खरंच खूप फायदेशीर आहे. इंग्लंडमध्येही रहाणेनं संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळी केली होती. रहाणे स्लिपमध्ये शानदार कॅच घेतो." 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स 

• तारीख : 7 ते 11 जून, 2023 
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन 
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
• रिझर्व डे : 12 जून

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final Ind vs Aus: 'सॉफ्ट सिग्नल' हद्दपार, हेल्मेटही... WTC फायनलमध्ये नव्या नियमांची नांदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget