एक्स्प्लोर
Rishabh Pant News : दुखापत झाली... तरीही थांबला नाही पंत! लॉर्ड्सवर ठोकलं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम
IND vs ENG 3rd Test News : दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला ऋषभ पंत मैदानात परतला आणि परतल्यावर थेट इतिहास लिहून गेला.
Rishabh Pant Breaks MS Dhoni Record
1/8

लॉर्ड्स टेस्ट सामन्यात भारतीय संघासाठी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.
2/8

दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला ऋषभ पंत मैदानात परतला आणि परतल्यावर थेट इतिहास लिहून गेला.
3/8

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात विकेटकीपिंग करताना ऋषभ पंत जखमी झाला होता. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने कीपिंगची जबाबदारी घेतली.
4/8

मात्र भारताचे तीन विकेट्स गेल्यानंतर पंत मैदानात फलंदाजी करण्यासाठी आहे. मग काय, त्याने लॉर्ड्सवर ‘पंत’ ब्रँडचा तुफान शो सुरू केला.
5/8

यादरम्यान, पंतने अर्धशतक पूर्ण केलं आणि ते थेट षटकार मारत.
6/8

केएल राहुलसोबत त्याने शतकी भागीदारी (109 धावा) केली आणि भारताचा स्कोअर 200 पार गेला.
7/8

पंतने महेंद्रसिंग धोनीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला आहे. धोनीने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेत एकूण 349 धावा केल्या होत्या, पण ऋषभ पंतने फक्त तीनच सामन्यांमध्ये हे आकडे पार करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
8/8

हेच नाही तर ऋषभ पंतने दुसऱ्यांदा SENA (साउथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी त्याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात असा पराक्रम केला होता.
Published at : 12 Jul 2025 05:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























