Samit Dravid : 7 सामन्यात फक्त 82 धावा तरी द्रविडच्या पोराला टीम इंडियात का मिळाली संधी? जाणून घ्या कारण
Rahul Dravid Son Samit Dravid : भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविड कोच म्हणून कार्यकाळ संपला. त्याच्या जाण्यानंतर आता आणखी एका द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे.
Rahul Dravid Son Samit Dravid Selection U19 Team India : भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविड कोच म्हणून कार्यकाळ संपला. त्याच्या जाण्यानंतर आता आणखी एका द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. राहुलचा स्वतःचा मुलगा समित द्रविड आता टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत दिसणार आहे.
वडिलांप्रमाणे उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या समितला भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळाले आहे, ज्याचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. द्रविड कुटुंब आणि त्यांचे चाहते या बातमीने नक्कीच खूश असतील. पण या निवडीबाबत काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत आणि याचे कारण समितची अलीकडची कामगिरी आहे.
7 सामन्यात अपयश
गेल्या दोन वर्षांपासून सर्वांच्या नजरा 18 वर्षीय समित द्रविडवर आहेत. कूचबिहार ट्रॉफीसारख्या ज्युनियर स्पर्धेत खेळून आपला ठसा उमटवणारा समित गोलंदाजीसोबतच फलंदाजीही करू शकतो. अशा स्थितीत तोही 19 वर्षांखालील संघाच्या माध्यमातून हळूहळू टीम इंडियाचे दार ठोठावेल, अशी आशा सर्वांना होती.
आता समित द्रविडला अंडर-19 संघात स्थान मिळाले आहे, मात्र या निवडीपूर्वीच्या त्याच्या कामगिरीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आजकाल समित कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या टी-20 टूर्नामेंट, महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये खेळत आहे. येथील म्हैसूर वॉरियर्स संघाकडून खेळणाऱ्या समितसाठी ही स्पर्धा चांगली राहिलेली नाही. संघाच्या साखळी टप्प्यात त्याने 10 पैकी 7 सामने खेळले पण या काळात त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावले नाही. या 7 सामन्यात त्याला केवळ 82 धावा करता आल्या. यातही त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 33 धावांची होती.
मग समितची का झाली निवड?
वरिष्ठ क्रिकेटमधील समितची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. त्यातही तो काही प्रभाव पाडू शकला नाही आणि तरीही त्याची अंडर-19 मध्ये निवड झाली आहे. साहजिकच या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मग निवड समितीने या युवा खेळाडूची निवड का केली? यालाही कारण आहे. महाराजा करंडक स्पर्धेत समित अपयशी ठरला असला तरी त्याने यावर्षी जानेवारीत कूचबिहार येथे झालेल्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती.
ದ್ರಾವಿಡ್ ಸರ್ ಮಗ ಗುರು ಇವ್ರು..🤯🔥
— Star Sports Kannada (@StarSportsKan) August 16, 2024
ಈ ಸಿಕ್ಸ್ ಗೆ ಒಂದು ಚಪ್ಪಾಳೆ ಬರ್ಲೇಬೇಕು..👏👌
📺 ನೋಡಿರಿ Maharaja Trophy KSCA T20 | ಬೆಂಗಳೂರು vs ಮೈಸೂರು | LIVE NOW #StarSportsKannada ದಲ್ಲಿ#MaharajaTrophyOnStar@maharaja_t20 pic.twitter.com/ROsXMQhtwO
त्यानंतर समितने कर्नाटकला चॅम्पियन बनवण्यात मदत केली होती. समितने त्यानंतर टूर्नामेंटच्या 8 सामन्यात 362 धावा केल्या होत्या आणि त्याच्या मध्यम वेगवान गोलंदाजीने 16 विकेट्सही घेतल्या होत्या. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत 2-2 विकेट घेत त्याने आपली छाप सोडली होती. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरील पहिल्या स्पर्धेत जरी तो अपयशी ठरला असला तरी 19 वर्षांखालील स्तरावर दमदार कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे.
हे ही वाचा :