Haris Rauf Wedding: Haris Rauf Wedding : लग्नाला अवघे दोनच दिवस, पाक बोलर वैतागला, हरिस रौफचं पत्नीबाबत महत्त्वाचं ट्विट
Haris Rauf Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफनं शनिवारी (24 डिसेंबर 2022) त्याची वर्गमैत्रीण आणि मॉडेल मुजना मसूद मलिकसोबत (Mujna Masood Malik) लग्न केलं.
Haris Rauf Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफनं शनिवारी (24 डिसेंबर 2022) त्याची वर्गमैत्रीण आणि मॉडेल मुजना मसूद मलिकसोबत (Mujna Masood Malik) लग्न केलं. पण लग्नाला दोन दिवसही उलटले नाही, तोच एका गोष्टीनं हरिस रौफचं टेन्शन वाढवलं. रौफनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याची पत्नी मुजना मलिकबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, ज्यानं कोणत्याही व्यक्तीची फसवणूक होऊ नये.
दरम्यान, हरिस रौफला मजुना मलिकशी लग्न केल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय. सोशल मीडियावर त्याच्या पत्नीचे अनेक बनावट खाती तयार करण्यात आली आहेत. पत्नीच्या नावानं बनावट खातं बनवल्यामुळं त्रासलेल्या हारिस रौफनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून पत्नी मुजना मसूद मलिकच्या नावानं तयार केलेली सर्व खाती बनावट असल्याची माहिती दिली.
ट्वीट-
Hello everyone, I just want to make it clear that my wife, Muzna Masood Malik, is not on any social media platforms. She does not have an official account. Please be cautious of any scams. Thank you so much for all of your prayers and good wishes.
— Haris Rauf (@HarisRauf14) December 25, 2022
हरिस रौफ पत्नीबाबत काय म्हणाला?
"सर्वांना नमस्कार, मला हे स्पष्ट करायचं आहे की, माझी पत्नी मुजना मसूद मलिक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. तिचं कोणतंही अधिकृत खातं नाही. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा खोटेपणापासून सावध राहा. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद."
मुजना मलिक कोण आहे?
मुजना मसूद मलिक ही एक मॉडेल, टीकटॉक स्टार आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. तिचं 52 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. मुजनाचा जन्म 1997 मध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे झाला. मुजना तिचे आई-वडील आणि भावंडांसोबत इस्लामाबादमध्ये राहते. तिला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. मोठी बहीण हादिया मसूदचे गेल्या वर्षी लग्न झाले असून ती पतीसोबत इस्लामाबादमध्ये राहते.
तरुण वयात करिअरची सुरुवात
मुजना मसूद मलिकनं तरुण वयात मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि सध्या ती अनेक पाकिस्तानी फॅशन ब्रँडसोबत काम करत आहे. तिला इंग्रजी, उर्दू आणि पंजाबी या तिन्ही भाषा येतात. मेकअपसोबतच ती फिटनेसचीही मोठी चाहती आहे. महत्वाचं म्हणजे, तिनं इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी इस्लामाबादमधून मीडिया आणि कम्युनिकेशनचं शिक्षण प्राप्त केल्याची माहिती समोर आलीय.
हे देखील वाचा-