Mohammad Rizwan News : पाकिस्तान खेळाडूची बंडखोरी! PCB विरुद्ध घेतला मोठा निर्णय, थेट केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामागचं कारण म्हणजे संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याची बंडखोरी.

Mohammad Rizwan PCB Central Contract News : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामागचं कारण म्हणजे संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याची बंडखोरी. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या केंद्रीय करारवर (PCB Central Contract) सही करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानकडून एकूण 30 खेळाडूंना या करारात स्थान देण्यात आलं आहे, पण त्यापैकी 29 जणांनीच सही केली आहे. एकमेव खेळाडू जो अजूनही करारावर सही करण्यास तयार नाही तो म्हणजे मोहम्मद रिजवान.
रिझवानच्या बंडखोरीचं कारण काय? (Why Mohammad Rizwan Refusing to Sign Contract)
रिझवानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या केंद्रीय करारवर सही करण्यास नकार का दिला, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, टी-20 संघातून वगळण्यात आल्यानं तो नाराज आहे. रिझवानने करारावर सही करण्यापूर्वी पीसीबीकडे थेट प्रश्न विचारला आहे की, “मला T20 संघातून का वगळलं?” त्याशिवाय, त्याने बोर्डाकडे काही अतिरिक्त मागण्या देखील ठेवल्या असल्याचं वृत्त आहे. मात्र त्या मागण्या नेमक्या काय आहेत, हे अद्याप उघड झालेलं नाही.
वनडे कर्णधारपदही काढून घेतलं अन्....
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रिझवानकडून वनडे कर्णधारपदही काढून घेतलं होतं. विशेष म्हणजे, त्या निर्णयामागचं कोणतंही कारण बोर्डाने सांगितलं नव्हतं. रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या संघांविरुद्ध मालिकाही जिंकल्या होत्या. तरीही त्याला हटवून शाहीन शाह आफ्रिदीला नवीन कर्णधार बनवण्यात आलं.
PCB च्या मनमानीविरोधात रिजवानचा प्रश्न (Mohammad Rizwan PCB Central Contract News)
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर झाला, पण रिझवानला संघाबाहेर ठेवण्यात आलं, तेही कोणतीही माहिती न देता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या या सततच्या मनमानी निर्णयांमुळे कंटाळलेल्या मोहम्मद रिजवानने अखेर बंडाचा मार्ग स्वीकारला आहे. आणि त्यामुळेच त्याने केंद्रीय करारवर सही करण्याआधीच बोर्डाकडे थेट स्पष्टीकरण मागितलं आहे.
"Haq par kharey raho Allah zaroor izzat dey ga, "Tanveer Ahmed supports Mohammad Rizwan for standing up to PCB, questioning his T20 squad omission, and encouraging him to stay strong for his rights.#TOKSports #MohammadRizwan pic.twitter.com/qDiUGESk6Z
— TOK Sports (@TOKSports021) October 28, 2025
हे ही वाचा -
















