एक्स्प्लोर

Karthik Meiyappan: टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेऊन जगाचं लक्ष वेधलं; चेन्नईत जन्मलेला कार्तिक मय्यपन आहे तरी कोण?

Karthik Meiyappan: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात यूएई संघाचा युवा गोलंदाज कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला.

Karthik Meiyappan: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) यूएई संघाचा युवा गोलंदाज कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला. या स्पर्धेत हॅट्ट्रीक घेणारा कार्तिक मय्यपन पहिला आणि जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. चेन्नईमध्ये जन्मलेला आणि यूएईच्या संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्तिकनं क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. यापूर्वी ब्रेट ली (2007), कर्टिस कॅम्फर (2021), वानिंदु हसरंगा (2021), कगिसो रबाडा (2021) यांनी टी-20 विश्वचषकात हॅट्रीक घेण्याचा पराक्रम केलाय. 

टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत स्थान मिळवण्यासाठी यूएई आणि श्रीलंका सायमंड स्टेडियमवर महत्वाचा सामना खेळला जातोय.या सामन्यात यूएईनं नाणेफेक जिंकून प्रथम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून यूएईसमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेच्या डावातील 15व्या षटकात कार्तिक मय्यपननं इतिहास रचला. या षटकात मयप्पननं पॉवर हिटर बानुका राजपक्षे, चारिथ असालंका आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला सलग तीन चेंडूत बाद करून टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेतली.

व्हिडिओ-

 

कार्तिक मय्यपनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
दरम्यान, 22 वर्षीय कार्तिक मय्यपन त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ 13वा सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी त्यानं 16च्या सरासरीनं 18 विकेट घेतल्या. 25 धावांत 4 विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. कार्तिक मयप्पननं 8 एकदिवसीय 10 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 37 धावा खर्च करून 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.

टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा पाचवा गोलंदाज
ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं 2007 च्या टी-20 विश्वचषकात पहिल्यांदा हॅट्ट्रीक घेतली होती. महत्वाचं म्हणजे, मागच्या टी-20 विश्वचषकात तीन गोलंदाजांनी हॅट्रीक घेतली. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कॅम्पफरनं नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केलीय. त्यानंतर श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget