(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI 2022 : वेस्टइंडीजचा स्टार खेळाडू कोरोनाबाधित, भारताविरुद्ध सामन्याला मुकणार
IND vs WI : पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. पण या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडीजच्या एका दिग्गज खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे.
Jason Holder Corona Virus : भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI 2022) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. पण या सामन्यापूर्वीच संघातील एक महत्त्वाचा खेळाडू स्टार ऑलराऊंडर जेसन होल्डरला (Jason Holder) कोरोनाची बाधा झाली आहे. सामन्यापूर्वी काही वेळापूर्वीच त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामुळे पहिल्या सामन्याला तरी तो मुकणार आहे. दरम्यान भारताचा स्टार फलंदाज केएल राहुललाही कोरोनाची बाधा झाल्याचं नुकतच समोर आलं होतं.
कसा आहे वेस्ट इंडीजचा संघ?
निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
Shubman Gill will partner Shikhar Dhawan at the top of the order; Jason Holder out due to COVID-19 while Ravindra Jadeja will miss the first two ODIs.https://t.co/zDrtoFCkmB#Cricket #ODI #WIvIND #ESPNCaribbean pic.twitter.com/X4OWW7eUyy
— ESPN Caribbean (@ESPN_Caribbean) July 22, 2022
आजचा सामना होणाऱ्या मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे किमान 250 धावसंख्या अपेक्षित आहे.
भारताचं पारडं जड
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ आतापर्यंत 136 वेळा आमने- सामने आले आहेत. यापैकी 67 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 63 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बाजी मारलीय. यातील चार सामने रद्द झाले आहेत. महत्वाच म्हणजे, वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या अखेरच्या पाच एकदिवसीय सामने भारतानं जिंकले आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Playing 11 : जाडेजाला दुखापत, अक्षर पटेलला मिळाली संधी, पहिल्या सामन्यासाठी कसा आहे भारतीय संघ?
- IND vs WI, 1st ODI Preview : आज रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना, मैदानाची स्थिती, Head to Head रेकॉर्ड, सर्वकाही एका क्लिकवर
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!