Virat Kohli: कसोटी कर्णधारपद सोडण्यावर विराट कोहलीनं सोडलं मौन, धोनीचं दिलं उदाहरण
Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.
Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाचा संघ व्यवस्थापनासह चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहलीनं कसोटी कर्णधाराचा राजीनामा का दिला? याबाबत अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. अखेर विराटनं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर मौन सोडलं आहे. पुढे जाणे हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. लीडर होण्यासाठी कर्णधार असणे गरजेचं नाही, असं विराटनं म्हटलंय. त्यावेळी त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचाही उल्लेख केलाय.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली म्हणाला की, “प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो. याची तुम्हाला स्पष्ट जाणीव असली पाहिजे. लोक म्हणतील 'या माणसाने काय केले आहे? परंतु जेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा आणि स्वत:ला साध्य करण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमचं काम केलंय."
एमएस धोनीचा उल्लेख करताना कोहली म्हणाला की, "ज्यावेळी धोनी संघात होता, तेव्हा तो लीडर नव्हता असे नाही. तो असा होता की ज्यांच्याकडून इनपुटची नेहमीच गरज असते. पुढे जाणे हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. आता एक फलंदाज म्हणून मी संघासाठी अधिक योगदान देऊ शकतो आणि विजयात भूमिका बजावू शकतो. मी खेळाडू असतानाही कर्णधारासारखाच विचार केला. संघानं जिंकावं असं मला नेहमीच वाटतं."
हे देखील वाचा-
- आम्ही मासांहार करुन वाघाप्रमाणे झालो आहे, म्हणून आमच्याकडे वेगवान गोलंदाज अधिक, शोएब अख्तरचा अजब दावा
- Happy Birthday Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या आठव्या हंगामात ऋतुराजची मोठी कामगिरी, विराट आणि धोनीलाही टाकलं मागे
- IND vs WI, T20 Series: भारतासमोर वेस्ट इंडीजच्या 'या' फलंदाजांचं मोठ आव्हान, इंग्लंडविरुद्ध मालिकेत पाडलाय धावांचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha