Virat Kohli To Open for RCB: आयपीएल 2021 मध्ये ओपनिंग करणार, विराटची माहिती
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विराटने 52 चेंडूत नाबाद 80 धावा करत इंग्लंडला 225 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिलं होतं. त्याला उत्तर म्हणून पाहुण्या संघाने निर्धारित षटकात केवळ 188 धावा केल्या आणि भारताने पाचवा सामना 36 धावांनी जिंकला.
INDvsENG 5th T-20 : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी -20 सामन्यात सलामीवीर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला. सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतर आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल विराटने मोठं वक्तव्य केलं आहे. पाचव्या सामन्याआधी कोहलीने टी -20 फॉरमॅटच्या 83 डावात फक्त 7 वेळा विराटने डावाची सुरुवात केली होती. मात्र रोहित शर्माबरोबर सलामीला आलेल्या विराटने स्फोटक आणि निर्णायक खेळी केली. त्यामुळे आता आयपीएल 2021 मध्येही ओपनिंगला उतरणार असल्याचं विराटने म्हटलं आहे.
विराटने 52 चेंडूत नाबाद 80 धावा करत इंग्लंडला 225 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिलं होतं. त्याला उत्तर म्हणून पाहुण्या संघाने निर्धारित षटकात केवळ 188 धावा केल्या आणि भारताने पाचवा सामना 36 धावांनी जिंकला. सोबत टी- 20 मालिकाही 3-2 ने जिंकली. टी -20 वर्ल्ड कपची तयारी पाहता कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून सलामीला येणार आहे.
India Win T20 Series | टी20 मालिका खिशात टाकत भारताची इंग्लंडवर मात
सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, मी याआधीही वेगळ्या क्रमवारीत फलंदाजी केली, पण आता मला समजले आहे की टीम इंडियाकडे मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. म्हणूनच मी रोहितबरोबर ओपनिंग भागीदारी करू इच्छित आहे आणि वर्ल्ड कपपर्यंत ही लय सुरू ठेवायची आहे. पुढे विराट म्हणाला की, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरकडूनही तो ओपनिंग करणार आहे.
शेवटच्या सामन्यात संघाच्या कामगिरीवर कोहली म्हणाला की, सामन्यात क्लासिक रोहित शर्मा दिसला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही तिसर्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली. मग हार्दिक पांड्याने चांगला शेवट केला. आमच्यासाठी हा एक परिपूर्ण सामना होता. आम्ही समोरच्या टीमला बॅकफूटवर ढकलले.