T20 World Cup 2024 : सौरभ नेत्रावळकरला मायभूमीत खेळण्याची संधी, अमेरिकेची टीम भारतात येणार, जाणून घ्या
T20 World Cup 2024 USA: अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेला.यामुळं अमेरिकेला डबल लॉटरी लागली आहे.
T20 World Cup 2024 USA न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं यंदा टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं आहे. अमेरिकेनं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि अमेरिका सुपर 8 मध्ये पोहोचले असून अ गटातील पाकिस्तान, आयरलँड आणि कॅनडा स्पर्धेबाहेर गेले आहेत. अमेरिकेला पावसामुळं मॅच रद्द झाल्यानं डबल लॉटरी लागली आहे. अमेरिका सुपर 8 मध्ये पोहोचली. याशिवाय 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमधील स्थान अमेरिकेनं निश्चित केलं आहे. आता अमेरिकेची सुपर 8 मध्ये पहिली लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19 जूनला होणार आहे.
अमेरिकेनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्ताला पराभूत केलं.तर, एक मॅच पावसानं रद्द झाली. भारताविरुद्ध त्यांनी चांगला खेळ केला मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं. आता अमेरिका सुपर 8 मध्ये दाखल झाली आहे. तर, दुसरीकडे टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी ते पात्र ठरले आहेत. अमेरिकेच्या संघातील सौरभ नेत्रावळकरची सर्वत्र चर्चा आहे. सौरभ नेत्रावळकरनं अमेरिकेसाठी चांगली कामगिरी केली आहे.
अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत केलं :
अमेरिकेनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयानं सुरुवात केली होती. अमेरिकेनं पहिल्या मॅचमध्ये कॅनडाला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. अमेरिकेनं भारताविरुद्ध देखील दमदार कामगिरी केली. भारताला अमेरिकेविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. अमेरिका आणि आयरलँड मॅच रद्द झाल्यानं त्यांना एक एक गुण मिळाले.
सुपर 8 मध्ये अमेरिकेसमोर कुणाचं आव्हान
सुपर 8 मध्ये अमेरिकेला तीन मॅच खेळाव्या लागणार आहेत. अमेरिकेची पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ही मॅच अँटिग्वामध्ये 19 जूनला होणार आहे. याशिवाय अमेरिका आणि वेस्ट इंडिज देखील आमने सामने येणार आहेत. ही मॅच 21 जूनला बारबाडोस मध्ये होईल. अमेरिकेच आणखी मॅच 23 जूनला होईल. यंदा पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेनं सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये जिथं पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ स्पर्धेबाहेर गेले असताना अमेरिका सुपर 8 मध्ये पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :