एक्स्प्लोर

Team India : न्यूझीलंडविरुद्ध दुसरी टी20 खेळण्यासाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा विश्वविक्रम

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवत तसंच एक मोठा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला आहे.

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा T20 सामना बे ओव्हल येथे खेळवला गेला. सामना भारताने 65 धावांनी जिंकला असून सामना पूर्ण होण्याआधीच भारताने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला. सामन्यात नाणेफेक होताच भारतीय संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक सामने भारत खेळला.

भारतीय संघ या कॅलेंडर वर्षातील आपला 62 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि यासह भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी 2009 मध्ये 61 सामने खेळले होते. हे दोन संघ सोडले तर आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला एका कॅलेंडर वर्षात 60 सामनेही खेळता आलेले नाहीत. यापूर्वी, भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 55 सामने 2007 मध्ये खेळले होते. यंदा भारताने 39 टी-20 सामना खेळले आहेत. त्यापैकी 28 मध्ये त्यांना विजय आणि 10 मध्ये पराभवाचा सामना केला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही आणि तो सामना या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना होता. जो पावसामुळे रद्ध झाला. याशिवाय भारतीय संघाने या वर्षात 18 एकदिवसीय सामनेही खेळला आहे, त्यापैकी 13 जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. या वर्षी भारत फक्त पाच कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी दोनमध्ये भारताने विजय आणि तीनमध्ये पराभवाचा सामना केला आहे. 

सामन्याचा लेखा-जोखा

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने नाबाद 111 धावा केल्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान ठेवले. पण 18.5 षटकांत न्यूझीलंडला टीम इंडियानं सर्वबाद केलं आणि सामना 65 धावांनी भारतानं जिंकला. दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता मंगळवारी तिसरा सामना खेळवला जाणार असून भारताने तो जिंकल्यास मालिकाही भारत जिंकल, तसंच न्यूझीलंडने सामना जिंकल्या मालिका अनिर्णीत सुटणार आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs GT IPL 2026 : राजस्थानच्या कॅम्पमध्ये खळबळ, अचानक कर्णधार बदलला! रियान पराग OUT, कोण झाला नवा कर्णधार?
राजस्थानच्या कॅम्पमध्ये खळबळ, अचानक कर्णधार बदलला! रियान पराग OUT, कोण झाला नवा कर्णधार?
RR vs GT Live Score IPL 2026 : रियान पराग अचानक बाहेर; यशस्वी जैस्वालच्या हाती राजस्थानची कमान, नाणेफेक जिंकताच मोठा निर्णय
RR vs GT Live Update IPL 2026 : रियान पराग अचानक बाहेर; यशस्वी जैस्वालच्या हाती राजस्थानची कमान, नाणेफेक जिंकताच मोठा निर्णय
सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’चा भव्य शुभारंभ
सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’चा भव्य शुभारंभ
DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO
DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
Embed widget