Suryakumar Yadav T20 Record : सूर्यकुमारची अफलातून फटकेबाजी, 49 चेंडूत ठोकलं शतक, दमदार रेकॉर्डही केला नावावर
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यावेळी सूर्यकुमार यादवनं एक अफलातून शतक ठोकलं आहे.
Suryakumar Yadav in IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दमदार फलंदाजीचा नमुना दाखवत तुफान फटकेबाजी केली. 51 चेंडूत नाबाद 11ृ1 धावा ठोकत सूर्याने एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी20 ठोकण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्याआधी रोहित शर्माने 2018 मध्ये हा रेकॉर्ड केला होता. सूर्याने आज त्याच्या फलंदाजीमध्ये तब्बल 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले. मैदानात चौफेर फटकेबाजी करत सूर्याने ठोकलेले अफलातून शॉट्स खरचं पाहण्याजोगे होते.
विशेष म्हणजे सूर्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांना धुतलं. अखेरच्या काही षटकात तर कोणत्याही प्रकारचा चेंडू न्यूझीलंडचे फलंदाज टाकत असतानाही सूर्यकुमार सीमारेषेपलीकडे पाठवतच होता. अखेरच्या षटकात त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. त्यामुळे तो नाबाद 111 धावाच करु शकला. विशेष म्हणजे सूर्यानं अर्धशतक केल्यानंतर अधिक वेगाने उर्वरीत 50 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 200 पार गेल्याचं पाहायला मिळालं होतं. 217.65 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं या 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.
Sensational SKY! 🎆
— BCCI (@BCCI) November 20, 2022
His 2⃣nd T20I 💯 👏 👏
This is a stunning knock 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/mIKkpD4WmZ #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/XunZedIB9e
न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान
सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात ठिकठाक झाली. ईशान किशन (Ishan Kishan) चांगल्या लयीत दिसत होता. पण पंत अगदी स्वस्तात 13 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. मग सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्यानेही फटकेबाजी सुरु केली. तितक्यात ईशान किशन 36 धावा करुन बाद झाला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हार्दिक (Hardik Pandya) यांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. पण सूर्युकमार मात्र तोवर तुफान फॉर्मात आला होता. तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता. 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली. ज्यामुळे भारत 191 धावा करु शकला आता 192 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी न्यूझीलंड मैदानात आली आहे.