एक्स्प्लोर

Team India : भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला पाकिस्तानात जाणार की आशिया कपची रणनीती राबवणार? पीसीबीला गुडघे टेकायला लावणार?

Team India : भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत 1 मार्च 2025 ला मॅच होऊ शकते. मात्र, बीसीसीआयनं पाकिस्तानला खेळण्यासाठी जायचं की नाही याचा निर्णय घेतलेला नाही.

नवी दिल्ली : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकत आयसीसीच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचं काम टीम इंडियानं केलं. रोहित शर्मानं टी 20 च्या कॅप्टन पदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा हाच भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत नेतृत्त्व करेल हे स्पष्ट केलंय. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ सहभागी होणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र, यासंदर्भातील विशेष बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार का हा सवाल अद्याप कायम आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडणार आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ एका गटात आहेत. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा  समावेश आहे. ही स्पर्धा  19  फेब्रुवारी ते 9  मार्च दरम्यान घेण्यात यावी असा प्रस्ताव पीसीबीनं आयसीसीला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यावेळी देखील एकाच गटात आहेत. मात्र, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की आशिया कप प्रमाणं त्रयस्थ ठिकाणी सामने खेळणवण्यास पीसीबीला आणि आयसीसीला भाग पाडणार हे पाहावं लागेल.

पीसीबीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आराखड्यानुसार भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या दृष्टीनं लाहोरमध्ये आयोजित केले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 1 मार्चला होणार आहे. मात्र, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ पाकिस्तानला पाठवणार का प्रश्न कायम आहे. 

बीसीसीआय आशिया कपची रणनीती राबवणार?

आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतानं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला होता. त्यामुळं पीसीबी, बीसीसीआय आणि आशिया क्रिकेट काऊन्सिलनं चर्चा करुन मार्ग काढला होता. भारतानं आशिया कप 2023 मध्ये श्रीलंकेत सामने खेळले होते. त्या प्रमाणं यावेळी देखील भारत पाकिस्तानला जाणार की दबाव टाकून भारताचे सामने त्र्ययस्थ ठिकाणी आयोजित करण्यास भाग पाडणार हे पाहावं लागेल. 

दरम्यान, भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ आला होता. आता  भारत पाकिस्तानमध्ये जाणार का हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या :

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs KKR IPL 2026 : रायपूरमधील आयपीएलच्या इतिहासातला सर्वात मोठा 'रन चेज' आता आरसीबीच्या नावे! विराट कोहलीच्या 10व्या शतकाने KKRचा केला खेळ खल्लास
रायपूरमधील आयपीएलच्या इतिहासातला सर्वात मोठा 'रन चेज' आता आरसीबीच्या नावे! विराट कोहलीच्या 10व्या शतकाने KKRचा केला खेळ खल्लास
RCB vs KKR Live Update IPL 2026 : विराट कोहलीचे वादळी शतक; आरसीबीचा कोलकाता नाईट रायडर्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय
RCB vs KKR Live Update : विराट कोहलीचे वादळी शतक; आरसीबीचा कोलकाता नाईट रायडर्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय
Team India : टीम इंडियात येणार खतरनाक ट्विस्ट! 3 वर्षांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची कुजबुज, BCCIच्या बैठकीत काय शिजतंय?
टीम इंडियात येणार खतरनाक ट्विस्ट! 3 वर्षांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची कुजबुज, BCCIच्या बैठकीत काय शिजतंय?
Pakistan Test Captain : बांगलादेशकडून लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! मसूदची खुर्ची धोक्यात, बाबर आझम पुन्हा बनणार कर्णधार?
बांगलादेशकडून लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! मसूदची खुर्ची धोक्यात, बाबर आझम पुन्हा बनणार कर्णधार?

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल
अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल
Monsoon Update : पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
Thalapathy Vijay : NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
MPSC चा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
Embed widget