एक्स्प्लोर
WI Squad vs Ind Tour : निवृत्तीची घोषणा केल्यानंतरही संघात निवड! भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे.
West Indies Womens squad for India tour
1/6

वेस्ट इंडिजच्या महिला संघाला भारत दौऱ्यावर जायचे आहे, जिथे भारतीय महिला संघाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. डिसेंबरमध्ये हा दौरा होणार आहे.
2/6

आता यासाठी वेस्ट इंडिजच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी हेली मॅथ्यूजकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. शमाईन कॅम्पबेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
3/6

तर, वेस्ट इंडिजची स्टार खेळाडू डिआंड्रा डॉटिनने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर, ती निवृत्तीतून परतली आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळली.
4/6

आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात तिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर ती आता प्रथमच एकदिवसीय संघात परतली आहे.
5/6

तिने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च 2022 मध्ये खेळला होता. तिने वेस्ट इंडिजसाठी 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3727 धावा आणि 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2817 धावा केल्या आहेत.
6/6

भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा एकदिवसीय आणि टी-20 संघ - हेली मॅथ्यूज (कर्णधार), शमायन कॅम्पबेल (उप-कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, अफी फ्लेचर, शाबिका गझनबी, चिनेल हेन्री, जैदा जेम्स, कियाना जोसेफ, मँडी मंगरू, अश्मिनी मुनीसर, करिश्मा रामहर रशादा विल्यम्स
Published at : 28 Nov 2024 11:09 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
जालना
महाराष्ट्र



















