Rohit Sharma : लाखो मुलं तुमच्याकडून प्रेरणा घेतात, मी त्यापैकी एक पण नशीबवान, रोहित शर्माची राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट
Rohit Sharma on Rahul Dravid: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ने राहुल द्रविड साठी एक खास पोस्ट लिहिली आहे. राहुल द्रविड यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं रोहित शर्मानं म्हटलंय.
मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या जोडीनं टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून देत कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात आनंद आणला. रोहित शर्मानं टीम इंडियाचं केलेलं नेतृत्त्व आणि राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षक म्हणून पार पाडलेली जबाबदारी याच्या जोरावर भारतानं सतरा वर्षानंतर विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या जोडीमुळं अवघ्या आठ महिन्यात भारतीय संघ आयसीसीच्या दोन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक देऊ शकला. तर, आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताला अपयश आलं. तर, टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदावरुन निवृत्त झाला. तर, रोहित शर्मानं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित शर्मानं राहुल द्रविड यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
रोहित शर्मानं काय म्हटलं?
प्रिय राहुल भाई, माझ्या भावना योग्य शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा शोध घेतोय. मात्र, मला विश्वास आहे की ते शब्द शोधू शकणार नाही. हा माझा प्रयत्न...
लहानपणाच्या दिवसांपासून इतर अब्जावधी मुलांप्रमाणं तुमच्याकडून प्रेरणा घेत होतो. मात्र, मी त्यांच्यापेक्षा नशीबवान ठरलो, मला तुमच्यासोबत काम करायला मिळालं.
तुम्ही क्रिकेट मधील महान खेळाडूंपैकी एक आहात. तुम्ही वैयक्तिक यश बाजूला ठेवून टीम इंडियाचं कोच म्हणून जबाबदारी स्वीकारलीत.तुम्ही असं व्यक्तिमत्व आमच्या समोर ठेवलं, त्यामुळं आम्ही कोणताही संकोच मनात न ठेवता तुमच्यासोबत चर्चा करत होतो. तुमच्याकडे असलेली विनम्रता देवानं दिलेली मोठी देणगी आहे. इतक्या दिवसानंतरही तुमचं खेळावरील प्रेम कमी झालेलं नाही, असं रोहित शर्मानं म्हटलं.
View this post on Instagram
रोहित शर्मा पुढं म्हणतो तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. अनेक आठवणी स्मरणात राहतील. माझी पत्नी तुम्हाला वर्क वाईफ मध्ये. मी स्वत:ला नशीबवान मानतो, असं रोहतिनं म्हटलं.
टी 20 वर्ल्ड कप विजयाबद्दल रोहित म्हणतो, ही गोष्ट तुमच्या प्रवासात मिसिंग होती. आपण ती संयुक्तपणे मिळवली याचा आनंद आहे.राहुल भाई तुम्ही विश्वासू, प्रशिक्षक आणि एक मित्र म्हणनं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, असं रोहित म्हणाला.
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या दिग्गजांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर, गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडेल. अद्याप गौतम गंभीर च्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या :
वनडे वर्ल्ड कपमधील दुखापत, आयपीएलचं अपयश ते टी 20 वर्ल्डकपमधील विजय, हार्दिकनं सगळं सांगितलं