एक्स्प्लोर

Gautam Gambhir : मोठी बातमी, गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड, जय शाह यांच्याकडून अधिकृत घोषणा

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या नियुक्तीची घोषणा जय शाह यांनी केली आहे.

नवी दिल्लीभारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या बाबत अधिकृत घोषणा केली आहे.  टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले.  राहुल द्रविड यांच्यानंतर  भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.  जय शाह यांनी गौतम गंभीर यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचं म्हटलं. 

गौतम गंभीर यांचं भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक क्रिकेट वेगानं विकसित होत आहे. गौतम गंभीर या बदलांचा साक्षीदार आहे. गौतम गंभीरनं त्याच्या कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विविध पदांवर काम केलं आहे. गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षक पदासाठी योग्य व्यक्ती आहे. तो भारताचं क्रिकेट पुढे नेईल, असं जय शाह म्हणाले.

गौतम गंभीर यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघासाठी स्पष्टपणे व्हिजन आहे. याला गौतम गंभीरच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि विविध पदांवर काम केल्याची जोड देखील आहे. यामुळं भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदावर काम करण्यासाठी गौतम गंभीर योग्य ठरतो. बीसीसीआयचा गौतम गंभीरला पुढील प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचं जय शाह म्हणाले. 

गौतम गंभीरचा कार्यकाळ किती ? 

राहुल द्रविडनं आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यानं टी 20 वर्ल्डकप पर्यंत पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं राहुल द्रविडला 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली होती. मात्र, राहुल द्रविडनं नकार दिल्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला होता. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरला भारताचं मुख्य प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं आहे.

गौतम गंभीरची कारकीर्द 

गौत गंभीरनं भारताकडून 58 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 9 शतकं आणि 22 अर्धशतकं केली आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 4154 धावा आहेत. गंभीरनं भारतासाठी 147 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये गंभीरनं 11 शतकं आणि 34 अर्धशतकं केली आहेत. गंभीरत्या नावावर 5238 धावा आहेत. गंभीरनं 37 टी 20 सामने खेळले असून त्यात त्यानं 7 अर्धशतकं केली आहेत. गौतम गंभीरनं केकेआरला दोनवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं तर 2024 मध्ये मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत विजेतेपद मिळवून दिलं.

संबंधित बातम्या : 

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखलLalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
Embed widget